नवाब मलिक, अनिल देशमुखांना विधान परिषदेलाही मतदानाची परवानगी नाहीच
मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये भाजपने तीन उमेदवार निवडून आणत महाविकास आघाडीला धूळ चारली. या निवडणुकीत ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात तुरुंगात असलेल्या नवाब मलिक, अनिल देशमुखांना मतदानाची परवानगी मिळाली नव्हती. त्यानंतर आता या दोघांना विधान परिषदेलाही मतदान करता येणार नाहीये. विधान परिषदेचं मतदान हे येत्या 20 जुनला होणार असून, 10 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. विधानपरिषद निवडणुकीत आता भाजपचे 5, शिवसेनेचे 2, राष्ट्रवादीचे 2 आणि काँग्रेसचे 2 असे 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
सोमय्यांची ठाकरे सरकारवर टीका
अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या मतदानासाठी परवानगी नाकारल्यानंतर किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे. न्यायालयाने उद्धव ठाकरे सरकारला झापड मारल्याचं त्यांनी म्हटलं आहे. राज्यसभा निवडणूकीत हात कापुन हातात दिले असंही ते म्हणाले. नवाब मलिक दाऊदचा एजंट आहे, त्याला मंत्रिमंडळातून काढत नाही, संजय राऊत यांना हवं तर टाळे मी देतो, संजय राऊत यांच्यात हिम्मत असेल तर कोर्टाला जाऊन सांगावं टाळ लावा असं म्हणत सोमय्यांनी राऊतांना उत्तर दिलं. जेव्हा मतं फुटली तेव्हा म्हणाले दिखा देंगे, न्यायालय न्यायाच्या बाजूने उभे राहत आहे. किरीट सोमय्या पुढे बोलताना म्हणाले, विधान परिषदेत गोंधळ झाला तर मुख्यमंत्री खुर्चीवर राहणार का? आमदार काहीही करू शकतात. संजय राऊत धमकी देऊ शकत नाही, त्यांना धमकी देता येणार नाही. कारण कुणालाच मतदान दाखवता येणार नाही असं सोमय्या म्हणाले.