महाराष्ट्र व कर्नाटक सीमाभागातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राज्यात विशेष समिती गठीत
महाराष्ट्र व कर्नाटक सीमाभागातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राज्यात विशेष समिती गठीत करण्यात आली आहे. कर्नाटक सरकार आणि मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडून अनेक वक्तव्य करण्यात आली. या पार्श्वभूमीवर दोन्ही राज्यांत तेढ निर्माण होत असल्यामुळे सीमाभागात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी समिती गठीत करण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला.
या समितीच्या अध्यक्षपदी अपर पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था), तर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक या समितीचे सदस्य असतील. समितीचे अध्यक्ष अपर पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) के. के. सारंगल हे असतील, तसेच कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, तर कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे आणि सांगली जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक बसवराज तेली यांचा समितीत सदस्य म्हणून समावेश होणार आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत याबाबत नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार गृह विभागाकडून आज ही समिती गठीत केली