Maharashtra HSC Result
Maharashtra HSC ResultTeam Lokshahi

Maharashtra HSC Result : मी नापास झालो म्हणून...; नागराज मंजुळेंची पोस्ट पुन्हा चर्चेत

गेल्या काही दिवसांपासून ज्या गोष्टीच्या प्रतिक्षीत असलेली गोष्ट म्हणजे महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल.
Published by :
shamal ghanekar
Published on

गेल्या काही दिवसांपासून प्रतिक्षीत असलेली गोष्ट म्हणजे महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल. आज दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा (HSC Exam Result News) निकाल जाहीर झाला आहे. त्यात 97 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. परंतु तीन टक्के विद्यार्थ्यांना अपयश आले. त्यांच्यांसाठी हा निकालच सर्वस्व नाही. यासंदर्भात नागनाथ मंजुळेंची पोस्ट पुन्हा चर्चेत आली आहे.

निकाल जाहीर झाला की काही जण निराश होतात. त्यातून टोकाचा निर्णय घेतला जातो. परंतु, अपयश आलं म्हणून खचून न जाता पुन्हा प्रयत्न करुन कसा यश मिळवता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे. दहावी बारावीमध्ये नापास होऊनही आज लाखो लोकांच्या मनावर राज्य करणारे अनेकजण आहेत. याची उदाहरणाही तुम्ही पाहू शकता. असेच मराठमोळे दिग्दर्शक, लेखक नागराज मंजुळे यांचं नाव सर्वांना माहिती आहे. नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांनी त्यांच्या फेसबुक पेजवरून त्यांची दहावीची मार्कशीट शेअर केली आहे. या मार्कशीटमध्ये दिसत आहे की, त्यांना फक्त 38 टक्के मिळालेले आहे. त्यांची ही फेसबुक पोस्टची सध्या चर्चा सुरू आहे.

Maharashtra HSC Result
HSC Result : लोकशाहीच्या वेबसाईटवर पाहा बारावीचा निकाल

मी दहावीत दोनदा नापास झालो होतो. पहिल्या प्रयत्नात पास झालो असतो फार तर पुढच्या वर्गात गेलो असतो, असं नागराज म्हणाले. मात्र नापास झालो म्हणून फार काही बिघडलं होतं असं मला वाटत नाही, असेही ते यावेळी म्हणाले आहेत.

दहावी, बारावी, MPSC , UPSC अथवा कुठलीही परीक्षा असो, ती अंतिम कधीच नसते. यश-अपयशात असल्या-नसल्यात आनंदानं जगत राहण्यापेक्षा दुसरं कुठलंही मोठं यश नाही, अशी पोस्ट मंजुळे यांनी केली आहे.

छाया कदम (Chhaya Kadam) यांनी ही एक पोस्ट केली आहे. त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, मी बारावीत नापास झाले होते. पण अपयशाने खचले नाही. मला कबड्डी खेळायला लै आवडायचे. वेडीच होते कबड्डीची. त्यामुळे अभ्यास कमी आणि खेळच जास्त. त्यातच अभ्यासाचा 'खेळ' व्हायचा. स्टेट लेवल पर्यंत कबड्डी खेळले. तिथेही आयुष्याचे काही झाले नाही. मात्र अनुभव खूप आले.आज माझ करियर वेगळ्याच क्षेत्रात धावतय. आयुष्य जगायला मजा येतेय हे मात्र नक्की. सांगायचं तात्पर्य एवढच की, अभ्यास, मार्क हे सर्वस्व नाही मित्रांनो, याचा अर्थ अभ्यास करू नये अस नाही. पण मार्क कमी मिळाले म्हणून हिरमसून जाऊन टोकाचे निर्णय घेऊ नका एवढेच सांगायचे आहे. वेगवेगळी क्षेत्र आपली वाट बघत आहेत.

नागराज मंजुळे किंवा छाया कदम ही केवळ दोनच अशी नावं नाहीत जी परीक्षेत नापास झाल्यानंतर ही त्यांनी हार न मानता प्रयत्न करत राहिले. अशी अनेक नावं आहेत. त्यांनी नापास होऊनही यश प्राप्त केले आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो जरी तुम्हाला या परीक्षेत अपयश आलं तरी खचून जाऊ नका, असा मोलाचा सल्लाही त्यांनी दिला आहे.

Maharashtra HSC Result
HSC Result : कोकण विभागाची बाजी तर मुंबईचा सर्वात कमी निकाल
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com