ताज्या बातम्या
कोरोनाचा वाढता धोका; देशात आढळले 24 तासांत 6 हजारांहून अधिक कोरोनाबाधित
कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे.
कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना दिस आहे. देशात आता चोवीस तासांत नव्या 6155 रुग्णांची वाढ झाली आहे. सध्या दररोजचा पॉझिटिव्हीटी दर हा 5.63 टक्क्यांवर आहे.
त्यामुळे आता कोरोना रुग्ण पाहता पुन्हा एकदा देशात मास्क सक्तीची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोना प्रादुर्भावात होणारी वाढ पाहता आरोग्य मंत्रालयानं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. तसेच, आरोग्य मंत्रालयाने लोकांना सोशल डिस्टेंसिंग पाळण्याचं, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणं त्याचप्रमाणे, मास्क वापरण्याचं आवाहन केलं आहे.