ताज्या बातम्या
कोरोनाचा धोका वाढतोय; पुन्हा मास्कसक्ती होणार?
राज्यात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे.
राज्यात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. देशात कोरोनाचा पॉझिटीव्हिटी रेट 3.38 टक्के नोंदवला गेला आहे. गेल्या 24 तासांत देभरात एकूण 5 हजार 335 रुग्णांची नोंद झाली आहे.
देशात आता सक्रिय रुग्णांची संख्या 25 हजार 587 वर पोहोचली आहे.कोरोनामुळे 13 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्ण पाहता पुन्हा एकदा देशात मास्क सक्तीची शक्यता वर्तवली जात आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांनी बैठक बोलवली आहे. या बैठकीमध्ये ते राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत चर्चा करणार आहेत.