🔴Maharashtra Breaking : बुस्टर डोसचा कालावधी झाला कमी
बुस्टर डोसचा कालावधी झाला कमी
देशात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं कोरोना प्रतिबंधक लसीच्या बुस्टर डोसचा कालावधी कमी केला आहे. दुसऱ्या डोसनंतर नऊ महिन्यांनी बुस्टर डोस दिला जात होता. हा कालावधी कमी करत सहा महिन्यांवर आणण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली.
गणेशोत्सवापर्यंत आषाढीच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांसाठी टोल माफ
कोकणातील गणेशोत्सवाप्रमाणे पंढरपूर येथे आषाढीच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला आहे. यासाठी वारकऱ्यांना वाहनांवर स्टिकर्स लावणे तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलिसांकडे नोंदणी करणे याबाबत व्यवस्था करण्याचे निर्देशही त्यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत.
आता शाखाप्रमुखांचाही सेनेला जय महाराष्ट्र
प्रकाश पुजारी आणि कौस्तुभ म्हामणकर यांचा शाखाप्रमुख पदाचा राजीनामा
नंदुरबारमध्ये विजांच्या कडकडासह पावसाची जोरदार बॅटींग
नंदुरबारसह जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली आहे. जून महिन्यानंतर पहिल्यांदाच नंदुरबार सह जिल्ह्यात मोठा पाऊस झाला आहे. शेतकरी राजासह नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. मागील एका तासापासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे.
फडणवीस गडकरींची विमानतळावर झाली भेट
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी गडकरी यांनी देवेंद्र फडणवीस यांना अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.
पनवेल मध्ये स्कूल बस जळून खाक, शालेय विद्यार्थी वाहतूक नियमावलीची ऐसी तैसी
वर्ध्यातील अतिवृष्टीने घेतला 10 हजार कोंबड्यांचा बळी.. कुक्कुटपालन शेडमध्ये पाणी शिरल्याने दुर्घटना
वर्ध्यातील आर्वी तालुक्यातील पावसाची अतिवृष्टी झालीय...आर्वी देउरवाड़ा मार्गावर नाल्या न काढल्याने पावसाचे पाणी थोपले यात रात्री झालेल्या पावसामुळे देऊरवाडा गावातील 110 घरात पाणी शिरले...यामुळे गावातील अनेक कुटुंबाची अत्यावश्यक वस्तूची मोठं नुकसान झाले...गावातील रस्त्यावर घरात तीन ते चार फूट पाणी साचले होते...तालुक्यातील बाराशे हेक्टर शेतातील पीक जमीन खरडून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाले आहेय..
वसई विरार नालासोपाऱ्यात मध्यरात्री पासून पावसाची संततधार सुरूच आहे
आज सकाळ पासून पावसाने जोरदार हजेरी लावल्या नंतर शहरातील सकल भागातील मुख्य रस्ते, सोसायटी या ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नालासोपारा पूर्व सेंट्रल पार्क, आचोळा रोड, तुलिंज रोड, स्टेशन परिसर, पश्चिमेकडील निलेमोरे गाव, विरार पश्चिम विवा कॉलेज,बोळींज रोड, पूर्वेकडील विवा जहँगिंड, वसई गास, देव तलाव, एव्हरशाईन, नवजीवन, सातीवली या परिसरात पाणीच पाणी झाले आहे.
राज्यातील तीन जिल्ह्यांत पुढील तीन दिवस रेड अलर्ट कायम
राज्यात NDRF च्या एकूण १७ टीम्स तैनात करण्यात आल्या आहेत. ५ टीम्स मुंबईत, तर कोल्हापूर, रत्नागिरी, ठाणे, #रायगड या जिल्ह्यांत प्रत्येकी २ टीम्स आहेत. पालघर, सिंधुदुर्ग, सातारा या जिल्ह्यांत प्रत्येकी १ टीम आहे.
Local Train Update: मुसळधार पावसामुळे अनेक रेल्वे रूळ जलमय, लोकलची वाहतूक धीम्या गतीने सुरु
राज्यात पुढील ४-५ दिवस सर्वदूर पसरलेल्या पावसाची शक्यता : हवामान विभाग
हवामान विभागाचे अधिकारी के. एस. होसाळीकर म्हणाले, “राज्यात पुढील ४-५ दिवस सर्वदूर पसरलेल्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र व इतर काही भागात अती मुसळधार पावसाचा इशारा आहे. कोकणात अनेक ठिकाणी पूर परिस्थिती उद्धवण्याची शक्यता आहे.”
चुनाभट्टी भागात डोंगर भाग कोसळला
चुनाभट्टी येथील नागोबा चौक परिसरातील डोंगर भाग कोसळला, सदर घटनास्थळी चेंबूर अग्निशमन जवान आणि चुनाभट्टी पोलीस कर्मचारी उपस्थित, दोन जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश, जखमी व्यक्तीला उपचार करण्यासाठी सायन रूग्णालयात पाठवले आहे
पवई तलावावर तरुणांची गर्दी वाढली
गेल्या दहा तासात माटुंगा येथे सर्वाधिक अर्थात ९६ मिमिपावसाची नोंद
राज्यात NDRF च्या एकूण १७ टीम्स तैनात
“राज्यात NDRF च्या एकूण १७ टीम्स तैनात करण्यात आल्या आहेत. ५ टीम्स मुंबईत, तर कोल्हापूर, रत्नागिरी, ठाणे, रायगड या जिल्ह्यांत प्रत्येकी २ टीम्स आहेत. पालघर, सिंधुदुर्ग, सातारा या जिल्ह्यांत प्रत्येकी १ टीम आहे,” अशी माहिती कमांडंट, कमांडिंग ऑफिसर अनुपम श्रीवास्तव यांनी दिली.
महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी
महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्रात पावसामुळे एनडीआरएफची टीम तैनात करण्यात आली होती. राज्यभरात 17 टीम तैनात आहेत. त्यापैकी 5 टीम मुंबई, 2 रायगड, रत्नागिरी, ठाणे, कोल्हापूर आणि 1-1 टीम पालघर, सातारा आणि सिंधुदुर्गमध्ये तैनात आहेत. कारण एनडीआरएफची टीम रवाना झाली आहे.