Maharashtra Board Re-examination: दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा 'या' तारखेपासून होणार; बोर्डाकडून वेळापत्रक जाहीर

Maharashtra Board Re-examination: दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा 'या' तारखेपासून होणार; बोर्डाकडून वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता दहावी आणि बारावीच्या जुलै - ऑगस्टमध्ये घेण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता दहावी आणि बारावीच्या जुलै - ऑगस्टमध्ये घेण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. महाराष्ट्र बोर्डाची दहावीची पुरवणी परीक्षा 18 जुलै ते 1 ऑगस्टदरम्यान तर बारावीची पुरवणी परीक्षा 18 जुलै ते 8 ऑगस्टदरम्यान होणार आहे.   

दहावी आणि बारावीच्या फेरपरीक्षेचं सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या http://www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. लेखी पुरवणी परीक्षा पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येईल.

मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाकडे छापील स्वरूपात देण्यात येणारं वेळापत्रक अंतिम असेल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com