संजय राऊत मातोश्रीची भाकरी खातात आणि शरद पवारांची चाकरी करतात; 'या' वक्तव्यानंतर अजित पवार दादा भुसे यांच्यावर संतापले
सत्ताधारी आणि विरोध नेहमी एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप करत असतात. दादा भुसे यांनी गिरणा बचाओ समितीच्या माध्यमातून गिरणी शुगर अॅण्ड एलाइड इंडस्ट्रीज लि.ची स्थापना केली होती. त्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांकडून लाखो रुपये गोळा केले.कंपनीच्या संकेतस्थळावर केवळ ४७ मुख्य शेअरधारकांची नोंद आहे. यांच्याकडून १६ कोटी २१ लाख, ८ हजार ८०० रुपये शेअर्सची रक्कम एकत्र केली आहे. परंतु तरीही दादा भुसे गिरणी सहकारी चिनी मिलला वाचवू शकले नाही. उलट शेतकरी आणि शेअर्सधारकांची फसवणूक केली. असे म्हणत त्यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला.
याच पार्श्वभूमीवर आता खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत हल्लाबोल केला आहे. राऊत यांनी ट्विट केले आहे की, हे आहेत मंत्री दादा भुसे. शेतकरी त्यांच्या विरोधात रस्त्यावर आले आहेत. गिरणा अॅग्रो नावाने 178 कोटी 25 लाखांचे शेअर्स शेतकऱ्यांकडून गोळा केले. पण कंपनीच्या वेबसाईटवर केवळ 1 कोटी 67 लाखांचे शेअर्स केवळ 47 सभासदांच्या नावावर दाखवले. ही लूट आहे. लवकरच स्फोट होईल.असे राऊतांनी म्हटले आहे.
याच पार्श्वभूमीवर विधासभेत दादा भुसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दादा भुसे म्हणाले की, संजय राऊत हे मातोश्रीची भाकरी खातात आणि शरद पवारांची चाकरी करतात असे म्हणाले. आमच्या मतांवर निवडून आलेले महागद्दार असे म्हणत दादा भुसेंनी राऊतांवर हल्लाबोल केला आहे.
दादा भुसेंच्या या वक्तव्यानंतर अजित पवार चांगलेच संतापले. विधानसभेत गदारोळ झाल्याचं बघायला मिळालं. तुम्हाला बोलायचे आहे ते बोला मात्र शरद पवारांचे नाव घेऊ नका असे म्हणत अजित पवारांनी दादा भुसेंवर जोरदार टिका केली. दादा भुसे तुम्ही तात्काळ माफी मागा, "दादा भुसे यांनी आपली भूमिका मांडताना शरद पवार यांचा इथे उल्लेख करणं योग्य नाही. दादा भुसे आणि अजित पवारांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. त्यानंतर दादा भुसेंच्या बचावासाठी शंभूराजे देसाई धावून आले. यानंतर दादा भुसे यांनी सांगितले की, मी शरद पवारांबद्दल काहीच चुकीचे बोललो नाही. मी शरद पवार यांची चाकरी करतात एवढेच बोललो. अध्यक्ष तुम्ही तपासुन पाहा. असे दादा भुसे यांनी सांगितले.