SSC Result 2023 : यंदाही मुलींनीच मारली बाजी तर कोकण विभाग अव्वल
Admin

SSC Result 2023 : यंदाही मुलींनीच मारली बाजी तर कोकण विभाग अव्वल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार आज २ जून २०२३ ला इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार आज २ जून २०२३ ला इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा बारावीप्रमाणे दहावीचं निकालाचा टक्काही घसरला आहे. मागील वर्षी महाराष्ट्राचा निकाल ९६. ९४ टक्के लागला होता तर यंदाचा निकाल ९३.८० टक्के लागलेला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष  शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेत निकाल जाहीर केला आहे. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक माध्यमिक शिक्षण मंडळ पत्रकार परिषद घेत हा निकाल जाहीर केला. यामध्ये मुलींचा निकाल 95.87 टक्के तर मुलांचा निकाल 92.05 टक्के लागला आहे. मुलांच्या तुलनेत मुलींची निकालात बाजी मारली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. यावर्षी 95.87 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण 92.05 टक्के आहे. 

यंदाही दहावीच्या निकालात कोकण विभागानं बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल 98.11 टक्के लागला आहे. तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा लागला आहे.

दहावीच्या निकालाची विभागवार टक्केवारी 

कोकण : 98.11 टक्के

कोल्हापूर : 96.73 टक्के

पुणे : 95.64 टक्के

मुंबई : 93.66 टक्के

औरंगाबाद : 93.23 टक्के

अमरावती : 93.22 टक्के

लातूर : 92.67 टक्के

नाशिक : 92.22 टक्के

नागपूर : 92.05 टक्के

SSC Result 2023 : यंदाही मुलींनीच मारली बाजी तर कोकण विभाग अव्वल
SSC Result 2023 : राज्यातील तब्बल ९३.८३ टक्के विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com