“शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे” गटाची आज नवी मुंबईत महाप्रबोधन यात्रा
“शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे” यांची महाप्रबोधन यात्रा वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात गुरुवारी आयोजित करण्यात येणार आहे. या सभेला माजी मंत्री भास्कर जाधव,सचिव विनायक राउत उपनेते सुषमा अंधारे उपस्थित राहणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मान्यता दिल्या नंतर हि नवी मुंबईतील पहिलीच सभा आहे. अशी माहिती त्यांच्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.या प्रबोधन यात्रेत नवी मुंबईतील शिवसैनिकाचे प्रबोधन करण्यासाठी ठाणे जिल्हा खासदार राजन विचारे, माजी मंत्री भास्कर जाधव सचिव विनायक राउत उपनेते सुषमा अंधारे हे नेते येणार आहेत.
निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल चिन्हाला मान्यता दिली. त्यानंतर महाप्रबोधन यात्रेचे आयोजन करण्याचे आदेश दिले गेले. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्व तयारी नवी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. नवी मुंबईतील हजारो शिवसैनिक या मेळाव्यासाठी येणार आहेत. या प्रसंगी प्रमुख वक्त्यांसह ठाणे लोकसभा क्षेत्र संपर्क प्रमुख सुधाकर देशमुख, नवी मुंबई संपर्क प्रमुख आप्पा पराडकर आदी या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.
यावेळी शिवसेनेची पुढची वाटचाल, उद्धव ठाकरे यांनी योजलेल्या योजना आदींची माहिती देण्यात येणार आहे. अशी माहिती बेलापूर मतदारसंघ अध्यक्ष विठ्ठल मोरे आणि ऐरोली मतदार संघ अध्यक्ष द्वारकानाथ भोईर यांनी दिली.