Madhya Pradesh Bus Accident
Madhya Pradesh Bus Accident

MP Bus Sidhi Accident : अमित शाहंच्या सभेतून परतणाऱ्या बसची ट्रकला धडक, 8 ठार, 50 जण जखमी

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्यक्रमआला गेलेल्या 3 बस गाड्यांना भरधाव ट्रकने जोरदार धडक मारली. यामुळे 8 जण ठार तर 50 जण जखमी झाले आहेत.
Published by :
Pankaj Prabhakar Rane
Published on

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातील सीधी येथे एका अनियंत्रित ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. मोहनिया बोगद्याजवळ ट्रकने बसला धडक दिली. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला. जखमींची संख्या 50 पेक्षा अधिक आहे, तर 15 ते 20 जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही बस गृहमंत्री अमित शहा यांच्या रॅलीसाठी गेली होती. तेथून परतत असताना एका भरधाव ट्रकने तिला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की बस जागीच पलटी झाली. रीवा कमिशनर आणि आयजी यासह, सीधीचे जिल्हाधिकारी व उच्च पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.

Madhya Pradesh Bus Accident
Railway Engine Model Miniature : अंबरनाथच्या आकाशने साकारल्या रेल्वे इंजिनाच्या साकारल्या हुबेहूब प्रतिकृती

रुग्णालय अलर्ट मोडवर :

या भीषण अपघाताची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी जवळपासची सर्व मोठी रुग्णालये अलर्ट मोडवर टाकली आहेत. या शिवाय अनेक रुग्णवाहिकाही घटनास्थळी पोहोचल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या गावातील लोकही घटनास्थळी जमा होत मदतकार्यात मदत करत आहेत. जखमींमध्ये सर्व प्रौढ असल्याचे सांगण्यात येत आहे. अधिकाऱ्यांनी रेवाच्या संजय गांधी रुग्णालय आणि सीधी जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या टीमला सर्व आपत्कालीन सेवांसाठी सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक :

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या भीषण अपघातावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करून लिहिले की, 'सीधी येथे बस उलटल्याने झालेल्या अपघाताबाबत अत्यंत दुःखद बातमी मिळाली. ईश्वर दिवंगत आत्म्यास आपल्या पावन चरणी स्थान देवो आणि कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. जखमी लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो. घटनास्थळी जिल्हाधिकारी, सीधी जिल्हा प्रशासन आणि एसपी उपस्थित आहेत. रेवा मेडिकल कॉलेज आणि सीधी जिल्हा रुग्णालयात जखमींवर उपचारासाठी सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या दु:खाच्या प्रसंगी राज्यातील जनता आणि शोकाकूल कुटुंबीयांच्या पाठीशी आहे'.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com