कोटींची मालमत्ता, आलिशान गाड्या, घरात थिएटर; आरटीओ अधिकाऱ्याकडे सापडलं घबाड

कोटींची मालमत्ता, आलिशान गाड्या, घरात थिएटर; आरटीओ अधिकाऱ्याकडे सापडलं घबाड

घर आहे की राजावाडा? असाच प्रश्न ईओडब्ल्यूला पडला असेल.
Published on

भोपाळ : मध्य प्रदेशातील जबलपूर येथील प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) संतोष पाल सिंह यांच्या घरावर आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) छापा टाकला. यादरम्यान झालेल्या तपासात संतोष पाल यांचे घर आहे की राजावाडा? असाच प्रश्न ईओडब्ल्यूला पडला असेल. कारण आरटीओ अधिकाऱ्याने घरात स्वतःचे खाजगी नाट्यगृह बनवले आहे. तर, संतोष पाल सिंग यांनी उत्पन्नापेक्षा 650 पट संपत्ती मिळवली आहे. हे सर्व पाहून सर्वांचेच डोळे विस्फारले होते.

ईओडब्ल्यूच्या पथकाने बुधवारी रात्री बेहिशोबी मालमत्ताप्रकरणी शताब्दीपुरम कॉलनीतील आरटीओ अधिकारी संतोष पाल यांच्या आलिशान घरावर छापा टाकला. त्यांच्या घरातून 16 लाखांच्या रोख रकमेसह काळ्या पैशातून मिळवलेल्या अमाप मालमत्तेची कागदपत्रे सापडली आहेत. यादरम्यान त्याच्या नावावर अर्धा डझन घरे आणि फार्महाऊससह आलिशान गाड्या तसेच १६ लाख कॅश तसेच लाखांचे दागिने असल्याची माहिती उघड झाली आहे. एवढेच नव्हेतर ड्रॉईंग रुमपासून ते बाथरुमपर्यंत सर्वच भव्य-दिव्य बनवले होते.

ईओडब्ल्यूचे एसपी देवेंद्र प्रताप सिंह यांच्या माहितीनुसार, संतोष पाल आणि त्यांची लिपिक पत्नी रेखा पाल यांच्याकडे मोठी संपत्ती असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, याची पडताळणी निरीक्षक स्वर्णजीत सिंह धामी यांनी केली होती. रात्री उशिरापर्यंतच्या तपासात समोर आलेल्या पुराव्यांवरून संतोष पाल यांच्याकडे वैध स्त्रोतांकडून मिळालेल्या उत्पन्नाच्या तुलनेत 650 टक्के अधिक मालमत्ता आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com