रक्षाबंधनाचे मोदी सरकारचे गिफ्ट! गॅस सिलिंडर 'इतक्या' रुपयांनी स्वस्त

रक्षाबंधनाचे मोदी सरकारचे गिफ्ट! गॅस सिलिंडर 'इतक्या' रुपयांनी स्वस्त

महागाईने हैराण झालेल्या जनतेला केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. सरकारने घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या किंमती कमी केल्या आहेत.
Published on

नवी दिल्ली : महागाईने हैराण झालेल्या जनतेला केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. सरकारने घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या किंमती कमी केल्या आहेत. गॅस सिलिंडरवर सरकारने 200 रुपये सबसिडी जाहीर केली आहे. उज्ज्वला योजनेंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांना हे अनुदान दिले जाणार आहे.

रक्षाबंधनाचे मोदी सरकारचे गिफ्ट! गॅस सिलिंडर 'इतक्या' रुपयांनी स्वस्त
मंत्रालयाच्या सुरक्षा जाळीवर उड्या मारत अप्पर वर्धा धरणग्रस्तांचे मंत्रालयात आंदोलन

सरकारच्या म्हणण्यानुसार, उज्ज्वला योजनेंतर्गत एलपीजी सिलिंडरच्या किमती 200 रुपयांनी स्वस्त होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. गॅसवरील अनुदानाचा लाभ केवळ उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांनाच मिळणार असल्याचे केंद्र सरकारने गेल्या वर्षीच स्पष्ट केले होते. इतर कोणालाही स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरवर सबसिडी दिली जाणार नाही. उज्ज्वला योजनेंतर्गत, सरकार आधीपासून 200 रुपये अनुदान देत होते, आता 200 रुपये अतिरिक्त अनुदान मिळणार आहे.

दरम्यान, उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभार्थी एका वर्षात एकूण 12 स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरवर सबसिडी घेऊ शकतात. 2016 मध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू करण्यात आली. या अंतर्गत सरकार दारिद्र्यरेषेखालील (BPL) कुटुंबांना एलपीजी कनेक्शन मोफत देते. सबसिडी मिळवण्यासाठी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक एलपीजी कनेक्शनशी लिंक करावा लागेल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com