एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कपात? काय आहेत नवीन दर
मागील काही महिन्यांपासून इंधन कंपन्यांकडून व्यावसायिक वापरासाठी असलेल्या एलपीजी गॅस दरात कपात करण्यात येत आहे. वर्षाच्या शेवटच्या महिन्यातील एलपीजीचे दर जाहीर करण्यात आले आहेत. आज इंधन कंपन्यांकडून एलपीजी गॅसच्या दरात कोणताही बदल करण्यात आला नाही. भारतीय इंधन कंपन्यांकडून दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी गॅस सिलेंडरचा दर जाहीर करतात.
नोव्हेंबर महिन्यात व्यावसायिक वापरासाठी असलेल्या गॅस सिलेंडर दरात 115.50 रुपयांची कपात करण्यात आली होती. तर, घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आला नव्हता. सहा जुलैपासून घरगुती सिलेंडरच्या किंमती स्थिर आहेत. यापूर्वी 1 ऑक्टोबर रोजी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 25.5 रुपयांची कपात करण्यात आली होती.
वाढत्या महागाईच्या काळात दिलासा देण्यासाठी एलपीजीचे दर कमी करण्याची मागणी करण्यात येत होती. मात्र, सरकारकडून, इंधन कंपन्यांनी कोणताही दिलासा दिला नाही. व्यायावसायिक वापरासाठी असलेल्या एलपीजी सिलेंडर 19 किलोचा असतो. दिल्लीमध्ये व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडर 1744 रुपयांना उपलब्ध आहे. कोलकाता येथे व्यावसायिक LPG गॅस सिलिंडर 1846 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. मुंबईत व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडर 1696 रुपयांना उपलब्ध आहे. चेन्नईमध्ये व्यावसायिक LPG गॅस सिलिंडरसाठी 1893 रुपये मोजावे लागतात.