LPG Cylinder : बजेट सादर होण्याआधीच महागाईचा भडका; एलपीजी सिलेंडरच्या किमतीमध्ये वाढ; दर काय?
आज अर्थसंकल्प सादर होणार आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अर्थमंत्री निर्मला सितारमण आज 1 फेब्रुवारी 2024 रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील संसदेचे अखेरचे अधिवेशनाला सुरुवात झाली आहे.लोकसभेच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. तसेच बजेटमध्ये नोकरदारांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. अर्थमंत्री निर्मला सितारमण या अर्थसंकल्पानंतर पत्रकार परिषद घेणार आहेत. दुपारी चार वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे.
याच पार्श्वभूमीवर आता बजेट सादर होण्याआधीच महागाईचा भडका उडालेला पाहायला मिळत आहे. आज 1 फेब्रुवारी 2024 पासून नवे दर लागू झाले आहेत. मुंबईत व्यावसायिक सिलेंडर आता 1723 रुपयांना मिळणार आहे. याच्याआधी 1708 रुपयांना मिळत होता. व्यावसायिक सिलेंडरच्या किमती 14 रुपयांनी वाढवण्यात आल्या आहेत.
घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. कोलकातामध्ये व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1887 रुपये करण्यात आली आहे. तर चेन्नईमध्ये त्याची किंमत 1937 झाली आहे.