आता 600 रुपयांना मिळणार एलपीजी सिलिंडर;  केंद्र सरकारचा मोठा निर्णय

आता 600 रुपयांना मिळणार एलपीजी सिलिंडर; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

महागाईचा आलेख वाढतच चालला आहे.
Published on

महागाईचा आलेख वाढतच चालला आहे. या महागाईमुळे सामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री बसली आहे मात्र आता केंद्र सरकारने आज मोठा निर्णय जाहीर केला आहे. उज्जवला योजनेतंर्गत ग्राहकांना आता एलपीजी सिलेंडर 600 रुपयांना मिळणार आहे.

रक्षाबंधन आणि ओणमच्या निमित्ताने केंद्र सरकारने 200 रुपयांचे अनुदान जाहीर केले होते. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांच्या भगिनींना आता 300 रुपये अनुदान मिळणार आहे. म्हणजेच उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आता 600 रुपयांना गॅस सिलिंडर मिळणार असल्याचे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com