LPG Gas Cylinder Price : LPG सिलेंडर झाला एवढ्या रुपयांनी स्वस्त

LPG Gas Cylinder Price : LPG सिलेंडर झाला एवढ्या रुपयांनी स्वस्त

सरकारी तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती कमी केल्या आहेत.
Published by :
Team Lokshahi
Published on

सरकारी तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती कमी केल्या आहेत. यानंतर आता 19 किलोंच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या ग्राहकांना प्रत्येक सिलेंडरवर सुमारे 40 ते 40 रुपयांचा नफा मिळणार आहे. सरकारी तेल विपणन कंपन्यांनी म्हणजेच, OMC नं 19 किलो LPG सिलेंडरची किंमत 39.50 रुपयांनी कमी केली आहे. आजपासून देशातील सर्व प्रमुख शहरांमध्ये 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत कमी झाली आहे.

केंद्र सरकारने 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत कमी करून ग्राहकांना ख्रिसमस आणि नवीन वर्षाची पूर्व भेट दिली आहे. ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत ₹ 39.50 ने कमी केली आहे. आता दिल्लीत 19 किलोचा गॅस सिलिंडर 1757.50 रुपयांना मिळणार आहे. मात्र, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. आजपासून म्हणजेच 22 डिसेंबरपासून ही दरकपात लागू होणार आहे.

LPG Gas Cylinder Price : LPG सिलेंडर झाला एवढ्या रुपयांनी स्वस्त
Ind vs SA 3rd ODI Match: आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये संजू सॅमसनचं पहिलं आंतरराष्ट्रीय शतक

एलपीजीच्या किमतीतील या कपातीमुळे हॉटेल आणि रेस्टॉरंट सारख्या व्यावसायिक एलपीजी वापरकर्त्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. याआधी व्यावसायिक सिलिंडरची किंमत दिल्लीत 1796.50 रुपये, मुंबईत 1749 रुपये, कोलकात्यात 1908 रुपये आणि चेन्नईमध्ये 1968.50 रुपये होती. 39.50 रुपयांच्या किमतीत कपात केल्यानंतर, व्यावसायिक सिलिंडर आता कोलकात्यात 1869 रुपयांना, मुंबईत 1710 रुपयांना आणि चेन्नईमध्ये 1929.50 रुपयांना मिळणार आहे.

गेल्या वेळी 30 ऑगस्ट 2023 रोजी घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 200 रुपयांनी कमी करण्यात आली होती. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, विनाअनुदानित घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत दिल्लीत 903 रुपये, कोलकात्यात 929 रुपये आणि मुंबईत 902.50 रुपये आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की LPG सिलिंडरच्या किमतीत होणारा बदल हा आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या किमतीतील चढ- उतारांवर अवलंबून असतो.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com