'विदर्भात अधिवेशन सुरू असताना या भागातील शेतकऱ्याला न्याय मिळेल का?'

'विदर्भात अधिवेशन सुरू असताना या भागातील शेतकऱ्याला न्याय मिळेल का?'

राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू असताना, या भागातील संत्री पिकावर 'कोळशी' या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.
Published on

नागपूर : राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू असताना, या भागातील संत्री पिकावर 'कोळशी' या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. विदर्भात अधिवेशन सुरू असताना या भागातील शेतकऱ्यांना न्याय मिळेल का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी विधानपरिषदेत लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केला.

'विदर्भात अधिवेशन सुरू असताना या भागातील शेतकऱ्याला न्याय मिळेल का?'
“अध्यक्ष महोदय हे काय चाललंय?”, अजित पवारांनी भर सभागृहात विचारला जाब

विदर्भातील नागपूर आणि अमरावती जिल्हा संत्र्यासाठी प्रसिद्ध आहेत. संबंधित मंत्र्यांनी दिलेले उत्तर हे समाधानकारक मिळालेले नाही, याबद्दल मिटकरी यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ओळींचा दाखला देत राज्यसरकारचे कान टोचले.

'विदर्भात अधिवेशन सुरू असताना या भागातील शेतकऱ्याला न्याय मिळेल का?'
रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणावरून विरोधी पक्षाकडून सभात्याग; अजित पवार संतापले

या भागातील फलोत्पादक शेतकऱ्याला नुकसान भरपाई किती मिळाली, कृषी विभागाने कोणतीही तपासणी केलेली नाही ही तपासणी कधीपर्यंत होईल, या नुकसानीला निकष काय लावले, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना काय करणार, असे प्रश्न उपस्थित करून अमोल मिटकरी यांनी विदर्भातील शेतकऱ्यांवर आलेल्या संकटाकडे सभागृहाचे लक्ष वेधले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com