Ashok Chavan: काँग्रेस नेते अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार? नार्वेकरांची घेतली भेट

Ashok Chavan: काँग्रेस नेते अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार? नार्वेकरांची घेतली भेट

काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली होती.
Published on

काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता अशोक चव्हाण भाजपामध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला असल्याची माहिती मिळत आहे. अशोक चव्हाण यांचा मोबाईल फोन सध्या नॉट रिचेबल आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com