मविआत मतभेद? उद्धव ठाकरे शरद पवार यांच्या भेटीला; सव्वा तास चर्चा

मविआत मतभेद? उद्धव ठाकरे शरद पवार यांच्या भेटीला; सव्वा तास चर्चा

सिल्व्हर ओकवर उद्धव ठाकरेंनी घेतली शरद पवार यांची भेट
Published on

मुंबई : राज्यात सध्या राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. ठाकरे गटाचे नेते उध्दव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली आहे. शरद पवारांचे निवासस्थानी सिल्व्हर ओक येथे उध्दव ठाकरे यांनी भेट घेतली आहे. तब्बल सव्वा तास या दोघांमध्ये चर्चा झाली असून अद्याप गुलदस्त्यात असली तरी मविआतील मतभेदांच्या पार्श्वभूमीवर दोघांची भेट महत्वपूर्ण मानण्यात येत आहे. यामुळे ठाकरे-पवार भेटीकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

मविआत मतभेद? उद्धव ठाकरे शरद पवार यांच्या भेटीला; सव्वा तास चर्चा
'नऊ महिने झाले बाळ व्हायला आलय, उद्धव ठाकरे किती दिवस बोलणार सुनबाई-सुनबाई'

महाविकास आघाडीत मागील काही दिवसांपासून अनेक मतमतांतरे पाहायला मिळत आहे. ईव्हीएम मशिनचा वापर तसेच, गौतम अदानी यांची जेपीसी चौकशी यावर शरद पवारांनी ठाकरे गटापेक्षा वेगळी भूमिका घेतली होती. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीवरून कॉंग्रेस, ठाकरे गटासह विरोधी पक्षांनी भाजपला लक्ष्य केले आहे. परंतु, शरद पवार यांच्यासह अजित पवार आणि जयंत पाटील यांनी अनेक प्रश्न महत्त्वाचे असल्याचे सांगत पंतप्रधानांची पाठराखण केली होती. यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे संजय राऊतांसह शरद पवारांच्या भेटीला पोहोचले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com