अजित पवार भाजपात जाणार? सुषमा अंधारे म्हणाल्या, भाजपकडून मुद्दामहून...

अजित पवार भाजपात जाणार? सुषमा अंधारे म्हणाल्या, भाजपकडून मुद्दामहून...

ज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपासोबत जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
Published on

बीड : राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपासोबत जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अशातच, अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या चिन्हाचा फोटो ट्विटरवरुन हटविला आहे. यामुळे अजित पवार राष्ट्रवादी सोडणार असल्याच्या चर्चांनी अधिकच जोर धरला आहे. यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली असून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही मत मांडले आहे.

अजित पवार भाजपात जाणार? सुषमा अंधारे म्हणाल्या, भाजपकडून मुद्दामहून...
All is well आहे का? धनंजय मुंडे म्हणतात Perfectly well

ज्या पद्धतीने सध्या राजकारण सुरू आहे. ते जाणीवपूर्वक भाजपकडून महाविकास आघाडी सरकारमध्ये मिठाचा खडा टाकण्याच काम सुरू आहे. वज्रमूठ सभा तसेच इतर सभा पाहता मुद्दामहून खोड करण्याची कार्यपद्धती भाजपची सुरू आहे. मात्र, आता सुरू असलेल्या राजकारणावरून शिंदे गटाच्या आमदारांची काळजी वाटत असल्याचं अंधारे यांनी म्हटले आहे. परंतु, इतर काही असो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने ठामपणे ठरवले असून आम्हाला भाजपच्या मुजोरी विरोधात लढणे क्रमप्राप्त असल्याचं अंधारे म्हणाल्या आहेत.

दरम्यान, अजित पवार भाजपात जाण्याच्या चर्चांवर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.अजित पवारांबाबतच्या चर्चांमध्ये काहीही तथ्य नाही. अजित पवारांनी कुठलीही बैठक बोलावली नाही. सगळे सहकारी हे पक्षाला मजबूत करण्यासाठी कार्यरत आहेत, असे शरद पवार यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com