shinde fadnavis govt sushma andhare
shinde fadnavis govt sushma andhareTeam Lokshahi

पेशवाईचा वसा अन् वारसा चालवणारी माणसं सरकारमध्ये : अंधारे

भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभास शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी अभिवादन केले आहे.
Published on

पुणे : पुण्याजवळ असलेल्या भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी देशभरातून लाखो भीम अनुयायी जमले आहेत. आज पहाटेपासूनच विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायांनी गर्दी केली. 205 वा अभिवादन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडत आहे. यादरम्यान शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी विजय स्तंभास अभिवादन केले आहे.

shinde fadnavis govt sushma andhare
भीमा कोरेगांवमध्ये 100 एकर जमिनीवर स्मारक उभे राहावे; आठवलेंनी व्यक्त केली इच्छा

सुषमा अंधारे म्हणाल्या की, भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभ हा पेशवाईचा पाडाव केल्यानंतर त्याची आठवण म्हणून तो शौर्यस्तंभ म्हणून उभा केला आहे. सध्या पेशवाईचा वसा आणि वारसा चालवणारी माणसं सरकारमध्ये आहेत. ती माणसं इथं येणं अपेक्षितच नाही, असा निशाणाही त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर साधला आहे.

करनी सेनेबाबत विचारले असता करणी सेनेसारख्या चिल्लर लोकांवर मी काही बोलणार नाही पण यांचे जे बोल विके धनी आहेत त्या भाजप मधल्या कोणत्याही नेत्याने हे बोलून दाखवले मग त्यांना आंबेडकरी जनता काय आहे हे दाखवून देवू, अशा शब्दात अंधारेंनी करणी सेनेवर टीकास्त्र सोडले आहे.

shinde fadnavis govt sushma andhare
...तर शिवसेना एकसंध होण्यास वेळ लागणार नाही; केसरकरांचे सूचक वक्तव्य

दरम्यान, याआधी रामदास आठवले यांनी विजयस्तंभाला अभिवादन केले होते. ते म्हणाले की, भीमा-कोरेगाव येथे लाखोंच्या संख्येने लोक येत असतात. येथे १०० एकर जमिनीवर स्मारक उभे राहील. त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. यासाठी याबाबत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांना भेटणार असून स्मारकाची मागणी करणार आहे. आणि निधी समाज कल्याण विभाग सरकार देईल, असे त्यांनी सांगितले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com