आ देखे जरा! हिम्मत असेल तर 48 तासात मातोश्रीवर या; अंधारेंचे बावनकुळेंना चॅलेंज
मुंबई : ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फडतूस गृहमंत्री म्हणत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. या टीकेवरुन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना थेट धमकीवजा इशारा दिला आहे. याला ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. हिम्मत असेल तर 48 तासात मातोश्रीवर या. आ देखे जरा किसमे कितना हे दम, असे थेट आव्हानच अंधारेंनी बावनकुळेंना दिले आहे.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात उद्धव ठाकरे यांना मातोश्रीच्या बाहेर पडू देणार नाही. अहो तुमची उमेदवारी देवेंद्र फडणवीस यांनी कापली. बावनकुळे तुम्हाला चॅलेंज आहे हिम्मत असेल तर 48 तासात मातोश्रीवर या. आ देखे जरा किसमे कितना हे दम, असे सुषमा अंधारे यांनी म्हंटले आहे.
काल फडतूस शब्द वापरला तेव्हा काही भक्तगण चवथाळले. मग लोढा, चंद्रकांत पाटील यांनी महाराजांचा अपमान केला. तेव्हा भक्तांना राग आला नाही का? काल संभाजीनगरला भक्तांनी गोमूत्र शिंपडलं, अठरा पगड जातीचे लोक होते त्याचा अपमान होत नाही का? भक्तांचा चॉईस किती फडतूस आहे. आता भक्तगण चवथाळले आणि त्यांना राग आला मी त्यांच्या भावना समजू शकते. आम्ही तुम्हाला फडतूस म्हणू नये. पण का म्हणू नये? तुमचा आमदार आम्हाला काय काय म्हणतो त्याच काय, असा सवाल त्यांनी विचारला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हटले मी फडतूस नहीं काडतूस हूं. देवेंद्र भाऊ 2016 ला तुमच्या घरात एक बाई घुसली काय राव शोभलं पाहिजे. सिंघानिया आली रेकॉर्ड करून गेली. मग काल काय ऐकलं ते खरं आहे का? घरात घुसलेली बाईचा बंदोबस्त करा. काडतूसाची भाषा केली असेल तर ठाकरे बाणा ही एक तोफ आहे काडतूस समोर चालत नाही लक्षात ठेवा, असा पलटवारही सुषमा अंधारेंनी फडणवीसांवर केला आहे.
रोशनी शिंदे यांनी पोस्ट केली, तिने माफी मागितली. तरीही तिला पोटात लाथा बुक्या मारल्या. काल अनेकांनी सांगितलं ती महिला प्रेग्नेंट नव्हती. तर समजा कि ती प्रेग्नेंट नव्हती तर तुम्हाला तिला मारण्याचे परमिट मिळत का? माजी मुख्यमंत्री काल आयुक्तांना भेटायला आले ते गायब होते तर आम्ही सांगायचं कोणाला? पोलिस ऐकून घेत नाही आयुक्त गायब होतात. रोशनी शिंदे हिच्या हल्लेखोरांवर गुन्हा दाखल न करता आता त्यांच्यावरच गुन्हा दाखल करता. अहो पोलिसांनो तुमचं सदरक्षनाय खलनिग्रहनाय वाक्य आहे त्याच काय, असे त्यांनी म्हंटले आहे.