SC
SCTeam Lokshahi

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी होणार 'लाईव्ह', सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

२७ सप्टेंबरला होणार महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सुनावणी
Published by :
Sagar Pradhan
Published on

राज्यात एकीकडे प्रचंड राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे. अशातच आता महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर २७ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. या निर्णयाबाबत सर्वत्र प्रचंड उत्सुकतेचे वातावरण आहे. त्याच पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयातील सुनावण्या आता २७ सप्टेंबरपासून युट्यूबवर लाइव्ह टेलिकास्ट होणार आहे.

SC
प्रकल्प महाराष्ट्रात आणि मुलाखती चेन्नईत का ? आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारला सवाल

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश उदय लळीत यांनी पदभार स्विकारल्यापासून अनेक निर्णयांचा धडाका लावला आहे. त्यानंतर त्यांनी आज आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयातील घटनापीठासमोर असलेल्या खटल्यांची सुनावणी आता लाइव्ह करण्यात येणार आहे. २७ सप्टेंबरपासून सुरुवात होणार युट्यूबवर लाइव्ह टेलिकास्ट होणार आहे. नंतर, लाईव्ह स्ट्रिमिंगसाठी स्वतःचा प्लॅटफॉर्म विकसित करण्यात येणार आहे. अशी माहिती देण्यात आली आहे.

SC
उध्दव ठाकरेंविरोधात बोलाल तर थोबाड रंगवू; खैरेंचा रामदास कदमांना इशारा

२७ सप्टेंबरला महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सुनावणी होणार आहे. खरी शिवसेना कोणाची यावर त्याच दिवशी निर्णय होण्याची शक्यता आहे. तसेच न्यायालयाने घटनापीठासमोरील खटल्यांची सुनावणी लाईव्ह करण्याच निर्णय घेतला आहे. याबाबत बार अॅण्ड बेंचने वृत्त दिल आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com