खरी शिवसेना आमचीच, निकाल आमच्याच बाजूने लागेल - संजय शिरसाट
शिवसेनेत मागील काही महिन्यांपूर्वी बंडखोरी झाली. त्यामुळे राज्यात राजकीय भूकंप आला. मात्र, या बंडखोरीमुळे शिवसेनेत दोन गट पडले. परंतु, दोन्ही गटाकडून शिवसेना आपलीच असा दावा करण्यात येत आहे. यामुळे खरी शिवसेना, धनुष्यबाण कोणाचा? गोष्टींचा निकाल निवडणूक आयोगापुढे लागणार आहे. १७ तारखेच्या निकालानंतर हे चित्र स्पष्ट होईल. यावरच बोलताना आता शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले संजय शिरसाट?
शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना पार्श्वभूमीवर निकाल आमच्याच बाजूने लागेल, १७ तारखेनंतर उद्धव ठाकरेंच्या सेनेत कोणीच राहणार नाही. औरंगाबादेत बोलतांना त्यांनी शिवसेनेत यापुर्वी सगळ्या संघटनात्मक निवडणुका या बिनविरोध केल्या जायच्या, तिथे निवडणुका होतच नव्हत्या. आम्ही उठाव केल्यानंतर कुठे आता पक्षांतर्गत निवडणुका घेतल्या जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
पुढे ते म्हणाले की, यापुर्वी पक्षात निवडणुका कशा व्हायच्या हे मी जवळून पाहिले आहे. नेते ठरवायचे आणि बिनविरोध निवड केली जायची. पण आता आमच्या उठावानंतर त्यांना संघटनात्मक निवडणुका खऱ्या पद्धतीने घ्याव्या लागत आहेत. खरी शिवसेना कोणाची, नेते कोण? याचा फैसला १७ तारखेला लागणार आहे. आमच्याकडे ४० आमदार, १२ खासदार आहेत, आमची ताकद मोठी आहे, त्यामुळे निकाल आमच्याच बाजूने लागेल. असा देखील दावा संजय शिरसाट यांनी यावेळी केला आहे.