Shivaji Adhalarao Patil : २००९ साली शिवसेना आणि राष्ट्रवादी युती फायनल झाली होती

Shivaji Adhalarao Patil : २००९ साली शिवसेना आणि राष्ट्रवादी युती फायनल झाली होती

शिवजा आढळराव पाटील यांचा गौप्यस्फोट
Published on

प्रमोद लांडे | पुणे : रामदास कदमांपाठोपाठ (Ramdas Kadam) शिवाजी आढळराव पाटील (Shivaji Adhalarao Patil) यांनीही आपल्या मनातील खदखद आता बोलून दाखवली आहे. माझी हकलपट्टी केल्यानंतर मनाला खूप वेदना झाल्या, असे त्यांनी सांगितले. तसेच, २००९ साली शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी (BJP) युती फायनल झाली होती, असा गौप्यस्फोटही पाटलांनी केला आहे.

Shivaji Adhalarao Patil : २००९ साली शिवसेना आणि राष्ट्रवादी युती फायनल झाली होती
Ramdas Kadam : अजून किती जणांची हकालपट्टी करणारं? मातोश्रीवर बसून एवढंच काम शिल्लक राहिलं का?

शिवाजी आढळराव पाटील म्हणाले की, ३ जुलैला माझी हकलपट्टी केली. तेव्हापासून शांत होतो. मनाला वेदना झाल्या, माझी हक्कलपट्टी रद्द केली. नंतर उद्धव साहेबांना भेटलो व नाराजी व्यक्त केली. नवीन मुख्यमंत्र्यांच अभिनंदन केले म्हणून हक्कलपट्टी केली हे मला पटण्यासारख नव्हते, असेही त्यांना सांगितले.

मला ताकद द्या. मला पुणे किंवा शिरूर कुठलाच मतदारसंघ नको. मी काय गुन्हा केला, मला पक्षप्रमुख यांना विचारायच आहे. तीन तीन टर्म खासदार राहिलेल्याच्या हक्कलपट्टी का केली. अभिनंदनाची पोस्ट मला चुकीचे वाटत नाही. अनावधानाने छापले गेले असे म्हणता. पण संपादक संजय राऊत आहेत ना, असेही त्यांनी म्हंटले आहे.

Shivaji Adhalarao Patil : २००९ साली शिवसेना आणि राष्ट्रवादी युती फायनल झाली होती
देवेंद्र फडणवीसांचा चंद्रपूर दौरा; पूरग्रस्त पाहणी का आमदाराच्या वाढदिवसानिमित्त?

आत्ताची महाआघाडी २००९ लाच होणार होती. फक्त शिरूर लोकसभेमुळं ती अडली. शरद पवार आणि संजय राऊत यांच्यात चर्चा झाली. शरद पवारांना पंतप्रधान करण्यासाठी युती केली जाणार होती. मला तसं सांगण्यात आलं की राष्ट्रवादी आणि शिवसेना युती फायनल झालेली आहे. यासाठी उद्धव ठाकरेंची सभा रद्द केली जाणार होती. काय तर शरद पवार शिरूरमधून आणि मला मावळ मधून लढवायच होतं. मात्र, मला गृहीत धरू नका, असं म्हणून बाहेर पडलो. मग ही युती करायचं रद्द झालं. सांगायचं हे की आत्ताची महाविकासआघाडी तेंव्हाच झाली असती, असा गौप्यस्फोट शिवाजी आढळराव पाटलांनी केला.

ज्या पक्षासोबत लढतोय. त्याच्याबरोबर जुळवून घेणे शक्य नव्हतं. शिवसेना संपवायला निघालेल्या पक्षाशी जुळवून घेणं शक्य नाही. आता मुख्यमंत्री शिंदे यांचे पाठबळ मिळून काम करता येणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

सगळे राष्ट्रवादी नेते म्हणायचे आमचा खेड राजकारणाशी संबंध नाही. परंतु, खेड पंचायत समिती शिवसेना सदस्य फोडून शिवसेनेच्याच लोकांना जेलमध्ये टाकले जात होते. आपले मुख्यमंत्री आहेत म्हणून आम्ही अनेकदा जाऊन आलो. पण न्याय मिळाला नाही, अशी खंतही पाटील यांनी बोलून दाखवली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com