शिवशक्ती-भीमशक्ती अखेर एकत्र! उध्दव ठाकरेंकडून युतीची घोषणा
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचा मुहूर्त साधून आज शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा करण्यात आहे. या युतीच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. याची घोषणा उध्दव ठाकरे यांनी आज संयुक्त पत्रकार परिषदेत केली. वंचितची युती शिवसेनेसोबत झाली असून महाविकास आघाडीसोबत अद्याप नाही. यामुळे शिवसेनेच्या कोट्यातून वंचितला जागा द्यावा लागणार आहेत.
उद्धव ठाकरे म्हणाले की, आज बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस आहे. शिवसेना व वंचितच्या युतीची अनेकजण प्रतीक्षा करत होते. या आधी देखील असे प्रयत्न झाले होते. पुढची वाटचाल एकत्र करण्यासाठी आम्ही या ठिकाणी एकत्र येत आहोत. ठाकरे-आंबेडकर यांचे नातं जुनं आहे. आता जे राजकारणामध्ये जे चाललं आहे. सगळं मोडून काढलं जात आहे. देशाला मोकळा श्वास घेण्यासाठी व लोकशाही जिवंत आहे हे दाखवण्यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे, असे म्हणत त्यांनी युतीची घोषणा केली. निवडणुका आल्यावर गरिबांचा उदो उदो करायचा आणि झालं की उड्डाणे करायचे. हे आता मोडीत काढायचं आहे, असा निशाणा उध्दव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर साधला आहे.
तत्पुर्वी, सुभाष देसाई यांनी युतीसंबंधी माहिती दिली. आज ऐतिहासिक घटना घडत आहे. त्याचे आपण साक्षीदार आहोत. शिवसेना-वंचित यांच्यात गेले काही दिवस चर्चा सुरू होती. उद्धव ठाकरे-प्रकाश आंबेडकर यांच्यात अलीकडे दोन बैठका झाल्या. या दोन्ही नेत्यांनी असा निर्णय घेतला की, देश हुकूमशाहीच्या दिशेने जात आहे. देश भरकटवण्याची रास्त भीती वाटत आहे. त्यामुळे एकत्र येण्यासाठी निर्णय घेतला आहे. भविष्यातील संकटाला सामोरे जाण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला, असे देसाईंनी म्हंटले आहे.