शिवसेना भाजपच्या विरोधात रस्त्यावर; ठिकठिकाणी आंदोलने सुरु

शिवसेना भाजपच्या विरोधात रस्त्यावर; ठिकठिकाणी आंदोलने सुरु

राज्यातील Shivsena मतभेदाला भाजपच जबाबदार असल्याचे म्हणणे
Published on

मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे संपर्काच्या बाहेर असून त्यांच्यासोबत 22 आमदार असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे शिवसेनेत मोठा भूकंप आला असून ठाकरे सरकार अस्थिर होण्याच्या मार्गावर आहे. हे भाजपच्याच ऑपरेशन लोटसचा भाग असल्याच्या चर्चा आता रंगल्या आहेत. याविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले असून रस्त्यावर उतरले आहेत.

राज्यात ऑपरेशन लोटस सुरु झाले असून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याविरोधात शिवसेना आता भाजपच्या विरोधात रस्त्यावर उतरणार असून राज्यात सर्व ठिकाणी भाजपविरोधात आंदोलन करण्याचे आदेश शिवसैनिकांना देण्यात आले आहेत. याप्रमाणे राज्यभर शिवसैनिकांकडून आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. यावेळी भाजपविरोधी जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी मिलिंद आणि आमदार रवींद्र फाटक यांच्यावर शिंदे यांची नाराजी दूर करण्याची जबाबदारी सोपवली आहे. हे दोन्ही नेते सुरतला रवाना झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिंदे यांच्यासाठी त्यांच्याकडे निरोप दिला आहे. हा निरोप नेमका काय आहे, शिंदे माघार घेणार का, अशा अनेक चर्चा आता सुरू झाल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com