दिल्लीतही धक्का : शिवसेनेच्या 12 खासदारांनी घेतली लोकसभा अध्यक्षांची भेट, दिले हे पत्र...
महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंप (Maharashtra Politics) सुरु झाल्यानंतर त्याचे धक्के आज दिल्लीत पोहचले. शिवसेनेच्या 12 खासदारांनी दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेतली आहे. शिंदेची भेट घेतलेल्या या खासदारांमध्ये श्रीकांत शिंदे, भावना गवळी, हेमंत गोडसे, राहुल शेवाळे, कृपाल तुमाने, श्रीरंग बारणे यांच्यासह 12 खासदारांचा समावेश आहे. या खासदारांनी गटनेतेपदी राहुल शेवाळेंच्या नियुक्तीचे पत्र लोकसभा अध्यक्षांना दिले. तसेच संसदेतील शिवसेना कार्यालय ताब्यात घेण्याचा हालचाली सुरु केल्या आहे. लोकसभा अध्यक्षांंना लिहिलेल्या पत्रात दोन तृतीयांशपेक्षा जास्त खासदार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे कार्यालय मिळण्याची मागणी केली आहे.
ही आहेत 12 खासदार
प्रताप जाधव
सदाशिव लोखंडे
राहुल शेवाळे
भावना गवळी
संजय मंडलिक
कृपाल तुमाणे
श्रीरंग बारणे
धैर्यशील माने
श्रीकांत शिंदे
राजेंद्र गावित
हेमंत पाटील
हेमंत गोडसे
लोकसभा अध्यक्षांना पत्र
एकनाथ शिंदे यांना भेटण्याआधी या बंडखोर खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र दिलं. या पत्रात राहुल शेवाळे यांच्या नेतृत्वातील 12 खासदारांच्या गटाला मान्यता देण्याची मागणी केली. लोकसभेच्या शिवसेना संसदीय पक्षाच्या नेतेपदी राहुल शेवाळे आणि प्रतोदपदी भावना गवळी यांची नियुक्ती केल्याचे पत्र दिले. भावना गवळी या शिंदे गटाच्या मुख्य प्रतोद म्हणून कायम असल्याचं म्हटलं आहे. पण शिवसेनेनं आधीच भावना गवळी यांची हकालपट्टी केली आहे.