मातोश्रीवर उद्धव ठाकरेंसमोरच शिंदेंचा फोन; शिवसेनेच्या 'त्या' नेत्याने ऐकवला किस्सा

मातोश्रीवर उद्धव ठाकरेंसमोरच शिंदेंचा फोन; शिवसेनेच्या 'त्या' नेत्याने ऐकवला किस्सा

Shivsena आमदार फुटल्यानंतर आता स्थानिक पातळीवरही शिवसेनेत मोठी फुट पडत आहे
Published on

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या सत्ता स्थापनेनंतर शिवसेनेतून (Shivsena) अजूनही शिंदे गटात इन्कमिंग सुरु आहे. शिवसेनेचे आमदार फुटल्यानंतर आता स्थानिक पातळीवरही शिवसेनेत मोठी फुट पडत आहे. आजच मीरा-भाईंदर शिवसेनेचे 18 विद्यमान नगरसेवकांनी शिंदे गटात सामील झाले आहेत. अशात एका नेत्याने शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासमोर एकनाथ शिंदे यांचा फोन येताच त्यांची प्रतिक्रिया काय होती हा किस्सा सांगितला.

मातोश्रीवर उद्धव ठाकरेंसमोरच शिंदेंचा फोन; शिवसेनेच्या 'त्या' नेत्याने ऐकवला किस्सा
मंत्रिपदासाठी फिल्डिंग! शिंदेंसमोर शक्ती प्रदर्शनाचा ट्रेंड; कोण कोणावर पडणार भारी?

मातोश्रीवर उद्धव साहेबांसोबत बसलो असताना एकनाथ शिंदे यांचा फोन आला. हे कळताच उद्धव साहेब दुसऱ्या खोलीत निघून गेले. परत येऊन हे पण विचारले नाही की एकनाथ शिंदे काय बोलत होते. म्हणजे आमचा साहेब किती सोज्वळ आहे. हे विधान शिवसेनेचे कल्याण महानगर प्रमुख विजय साळवी यांनी केले आहे. कल्याणमध्ये आयोजित शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. विजय साळवी यांनी हा किस्सा सांगितल्यानंतर सर्व शिवसैनिक भावूक झाले होते.

मातोश्रीवर उद्धव ठाकरेंसमोरच शिंदेंचा फोन; शिवसेनेच्या 'त्या' नेत्याने ऐकवला किस्सा
दोन जणांचीच सध्या कॅबिनेट, हे महाराष्ट्राचे मालक झालेत; पवारांचे शिंदे सरकारवर टीकास्त्र

दरम्यान, आमदारानंतर आता शिवसेना खासदारही फुटीच्या उंबरठ्यावर उभे असल्याची चर्चा आहे. अशात एकनाथ शिंदे यांच्या गटात स्थानिक पातळीवरुनही मोठ्या प्रमाणात नगरसेवक सामील होत आहे. यामुळे शिवसेनेला खिंडार पडत असून डॅमेज कंट्रोल करण्यासाठी उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे स्वतः मैदानात उतरले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com