आदित्य ठाकरे यांनी हेर संकुचित वृत्ती सोडावी; शंभूराज देसाईंचा सल्ला

आदित्य ठाकरे यांनी हेर संकुचित वृत्ती सोडावी; शंभूराज देसाईंचा सल्ला

शंभूराज देसाईंनी दिले शिवसेनेच्या विविध आरोपांना प्रत्युत्तर
Published on

मुंबई : शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील ४०० किलोमीटर सिमेंट-काँक्रिट रस्त्यांच्या कंत्राटावरून पुन्हा शिंदे सरकारला लक्ष्य केलं होते. यावर आज शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आदित्य ठाकरे यांनी हेर संकुचित वृत्ती सोडावी, असा सल्लादेखील त्यांनी यावेळी दिला आहे. तसेच, तुम्ही कितीही बोललात तरी आम्ही बाळासाहेबांचे नाव घेणारच, असे त्यांनी म्हंटले आहे.

पालिकेची मुदत कायद्याने संपली आहे. वॉर्ड प्रकरण न्यायालयात आहे. प्रचलित कायद्यानुसार प्रशासक नियुक्त केले आहेत. प्रशासकाने कोणते निर्णय घ्यावेत हा त्यांचा निर्णय आहे. सरकारचा सल्ला घ्यावा हे नियमात आहे, नियमबाह्य काही नाही. कॉंक्रीटचे रस्ते अधिक चांगले असतात. ते अधिक टिकतात, हे लक्षात घेऊन पालिका प्रशासनाने घेतले आहेत. आदित्य ठाकरे यांना हे योग्य वाटत असेल याचा विचार आता मुंबईकरांनी करावे. आदित्य ठाकरे यांनी हेर संकुचित वृत्ती सोडावे, असा सल्ला शंभूराजे देसाईंनी दिला आहे.

तसेच, शिवसेना खासदार संजय राऊत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्यावर टीका करताना दिसत आहे. यावर बोलताना शंभूराजे देसाई म्हणाले, विरोधकांनी थोडा दम धरावा. कालच डाओसचा पहिला दिवस होता. पूर्ण डाओस परिषद होऊ द्या, मग कळेल राज्याला काय मिळालं मग बोलावे. गुजरातला प्रकल्प कोणाच्या काळात गेले? रेड कार्पेट वेलकमसाठी महाविकास आघाडीने बैठकी का घेतले नाहीत, महाविकास आघाडीने सुविधा दिल्या नाहीत. आमच्या सरकारला जबाबदार धरणे योग्य नाही, अशी टीका त्यांनी केली आहे.

निवडणूक आयोगासमोर आज शिवसेना व पक्षचिन्हाबद्दल सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर योग्य कागदपत्रे सादर केले आहेत. आमदार, खासदार, नगरसेवक, जिल्हा प्रमुख बहुमत शिंदे गटाकडे आहे. लोकशाहीत बहुमतला महत्व म्हणून निवडणूक आयोग शिंदे गटाच्या बाजूने निर्णय देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा आधार ठाकरे गटाला आहे. आपली माणसं जुन्या जाणत्या, जेलमध्ये गेलेले, निष्ठावान लोकांना बाजूला सारून राऊत राष्ट्रवादी, काँग्रेसचा आधार घेत आहे. बाळासाहेब यांच्या विचारांची प्रतारणा कोण करत आहे हे स्पष्ट होत आहे. बाळासाहेब यांना एक कुटुंबापुरते मर्यादित ठेवू नये, ते साऱ्या देशाचे हिंदूंचे होते, तुम्ही कितीही बोललात तरी आम्ही बाळासाहेबांचे नाव घेणारच, असे त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे वर्षा बंगल्यात जाणार होते. तेव्हा बंगल्याची साफसफाई सुरू होती. त्यावेळेस वर्षावर पोतभर लिंबू मिरच्या सापडल्या होत्या, असे तिथल्या लोकांनी सांगितले. आता तुम्हीच ओळखा कोणी त्या ठेवल्या असतील, असा पलटवार शंभूराजे देसाई यांनी शिवसेनेवर केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com