मी असू द्या, नाहीतर कोणी पण लोकसभेला खैरेचं डिपाॅझीटच जप्त करू - मंत्री भुमरे
राज्यात शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर प्रचंड राजकीय गदारोळ सुरु आहे. त्याच भाजपने आपले मिशन लोकसभा महाराष्ट्रात चालू केले आहे. मात्र, भाजपने महाराष्ट्रातील अनेक शिवसेनेच्या जागेवर आपला दावा केला. परंतु, त्यावर शिंदे गटाने देखील शांत भूमीका घेतली. दरम्यान, आता पहिल्यांदाच शिंदे गटाचे मंत्री संदीपान भुमरे यांनी औरंगाबाद लोकसभा निवडणूक आम्हीच लढवणार असल्याचे जाहीरपणे सांगितले. त्यावेळी त्यांनी औरंगाबाद शिवसेना (ठाकरे गट) माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर टीका केली.
काय म्हणाले भुमरे?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन केल्यानंतर माध्यमांशी बोलताना भुमरे म्हणाले की, मी असू द्या, नाहीतर अन्य कोणी लोकसभेला खैरेचं डिपाॅझीटच जप्त करू, असा दावा देखील भुमरे यांनी केला आहे.
यावर मागणी करण्यात गैर नाही, पण औरंगाबाद लोकसभा बाळासाहेबांची शिवसेनाच लढणार आणि जिंकणार देखील. निवडणुका म्हटलं की सगळेच राजकीय पक्ष तयारी करत असतात, आमची देखील तयारी सुरू आहे. शिंदेसाहेब ज्याला कुणाला लोकसभेची उमेदवारी देतील त्याला आम्ही निवडून आणू. असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.