‘त्या’ व्हायरल व्हिडिओवर शीतल म्हात्रे यांची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाल्या, ठाकरे गटाच्या...
राज्याच्या राजकारणात सध्या प्रचंड गोंधळ सुरु आहे. त्यातच दुसरीकडे आज गेल्या काही तासांपासून शिवसेनाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे या दोघांचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ मॉर्फ करुन सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. त्यामुळे या व्हिडिओवरून सध्या राजकारण चांगलंच तापल्याचे दिसून येत आहे. या प्रकारानंतर शीतल म्हात्रे यांनी संताप व्यक्त केला आहे. याबाबत त्यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली.
नेमकं काय शीतल म्हात्रे?
व्हायरल व्हिडिओ बोलताना त्या म्हणाल्या की, स्त्री म्हणून आज वेदना होत आहे. आवडीपोटी मी राजकारणात आले. राजकीय पार्श्वभूमी नसताना राजकारणात आले स्वत:ला सिद्ध केलं. ज्यानंतर निर्णय घेण्याची वेळ आली तेव्हा बाळासाहेबांचा विचार घेऊन निघालेल्या एकनाथ शिंदे यांना साथ देण्याचं ठरवंल. गेल्या 8-9 महिन्यात ट्रोल केलं जात आहे, कमेंट केल्या जात आहेत. मात्र, आम्ही आमच्या कामाकडे लक्ष देवून त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. मात्र काल मागाठणे येथे प्रकाश सुर्वे यांच्या कार्यक्रमात आले होते. तेव्हा मॉर्फ करुन वाईट मेसेजसह व्हीडिओ तयार करण्यात आला. बोलण्यासारखं काहीही नसलं की चारित्र्यावर बोललं जातं”, अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
पुढे त्या म्हणाल्या की, “हा व्हिडिओ ठाकरे गटाच्या अनेक फेसूबक पेजवरुन शेअर करण्यात आलं. बोलण्यासारखं काहीही नसलं की चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं. शिंदेसोबत गेल्याने माझ्यावर गलिच्छ आरोप करण्यात आले. या व्हायरल व्हिडिओ संदर्भात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी 1 अंधेरीतील पदाधिकारी आणि दुसरा दहीसरमधील कार्यकर्ता आहे” तसेच या सर्व प्रकारामागील मास्टरमाईंड कोण आहे, तो शोधून काढावा असं आवाहनही शीतल म्हात्रे यांनी पोलिसांनी केलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला फोन
जेव्हा ही घटना घडली तेव्हा सगळ्यात पहिला फोन हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आला. मला इतकंच म्हणाले, घाबरू नको तुझा भाऊ तुझ्या पाठीमागं ठामपणे उभा आहे. अशी माहिती त्यांनी दिली.