शिवसेना नाव आणि धनुष्यबाण शिंदे गटाला; शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
बारामती : निवडणूक आयोगामध्ये एकनाथ शिंदे यांचा विजय झाला आहे. धनुष्यबाण निशाणी व शिवसेना हे नाव बाळासाहेबांच्या शिवसेनेला म्हणजेच शिंदे गटाला मिळाले आहे. हा उध्दव ठाकरेंना मोठा धक्का मानण्यात येत आहे. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. फारसा फरक पडणार नाही. ते स्वीकारुन नविन चिन्ह घ्यावं लागेल, असे त्यांनी म्हंटले आहे.
काय म्हणाले शरद पवार?
तो निवडणूक आयोगाचा निकाल आहे. त्यावर चर्चा काही करता येणार नाही. त्यांना फारसा फरक पडणार नाही. ते स्वीकारुन नविन चिन्ह घ्यावं लागेल. मागेही कॉंग्रेसचं गाय वासरु चिन्ह होतं. पंजा घेतला. पण, त्यामुळे काही फरक पडला नाही. लोकांनी ते स्वीकारलं. आताही फरक पडणार नाही. काही दिवस चर्चा होत राहील. नंतर लोक विसरुन जातील, असे शरद पवार यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, शिवसेना संपली. परंतु, शिवसेना लेचीपेची नाहीये. म्हणून शिवसैनिकांनो खचू नका. ही लढाई शेवटपर्यंत लढावीच लागेल. विजय आपलाच होणार आहे. फक्त खचू नका जिद्द सोडू नका. मैदानात उतरलो आहे. आता विजयाशिवाय माघारी फिरायचं नाही. ही चोरी त्यांना पचणार नाही. जनता याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, अशी प्रतिक्रिया उध्दव ठाकरेंनी म्हंटले आहे.