अजित पवारांविरोधात शरद पवार 82 व्या वर्षी
मैदानात; महाराष्ट्र पिंजून काढणार

अजित पवारांविरोधात शरद पवार 82 व्या वर्षी मैदानात; महाराष्ट्र पिंजून काढणार

अजित पवार यांनी नऊ आमदारांसह शिंदे-फडणवीसांना साथ दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दंड थोपटले.
Published on

सातारा : अजित पवार यांनी नऊ आमदारांसह शिंदे-फडणवीसांना साथ दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दंड थोपटले असून मैदानात उतरणार असल्याचे संकेत दिले. शरद पवार लवकरच राज्यव्यापी दौरा करणार असल्याची माहिती दिली आहेत. या दौऱ्याची सुरुवात मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या मतदारसंघातून करण्यात येणार आहे.

अजित पवारांविरोधात शरद पवार 82 व्या वर्षी
मैदानात; महाराष्ट्र पिंजून काढणार
सुनील तटकरे अजित पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष; बैठकीत निर्णय

भुजबळ, तटकरे, वळसे पाटील हे तुम्हाला सोडून गेल्याचं दुःख आहे का? या प्रश्नावर शरद पवार म्हणाले, मला दुःख वाटत नाही. अशा गोष्टी घडल्यानंतर अंतिम निकाल सहा महिन्यांनी लागला, वर्षभराने लागला तरी तो निकाल या देशातला सर्वसामान्य मतदार देतो. माझा विश्वास सामान्य माणसावर आहे, उत्तर त्यांनी दिले. कारवाईचा निर्णय हा जयंत पाटील घेतील. पण, त्यासाठी मी मनात द्वेष ठेवून राजकारण करत नाही. त्यांनी जर भेटायची वेळ मागितली, तर विचार करू, असे म्हणत त्यांनी दारे खुली असल्याचे म्हंटले आहे.

तर, अडीच वर्षांपूर्वी राष्ट्रवादी शिवसेनेसोबत जाऊ शकते, तर मग आम्ही भाजपासोबत जाऊन काहीही चूक केले नाही, अजित पवारांच्या या विधानाचा शरद पवारांनी समाचार घेतला आहे. आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींची भूमिका योग्य आहे, असे म्हणणारा एकच पक्ष आणि नेता होता ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे. त्यानंतरच्या निवडणुकीत शिवसेना पक्षाने एकही उमेदवार उभा केला नाही आणि काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा दिला. त्यामुळे आत्ता आम्ही वेगळं काही करतोय असं नव्हे, असे शरद पवारांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com