सत्तातंरानंतर पहिल्यांदाच शरद पवार-एकनाथ शिंदेंच्या भेटीला; चर्चांना उधाण
मुंबई : राज्यात राजकीय वर्तुळात सध्या मोठ्या प्रमाणात उलथा-पालथ सुरु आहे. अशातच, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला पोहोचले आहेत. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान वर्षा बंगल्यावर शरद पवार पोहोचले आहेत. अर्ध्या तासांहून अधिक वेळ दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली आहे. या भेटीचा विषय अद्याप गुलदस्त्यात असला तरी सत्तातंरानंतर पहिल्यांदाच पवार-शिंदे यांची भेट होणार असल्याने सर्वांचेच लक्ष याकडे लागले आहे.
पुण्याच्या लोकसभा मतदारसंघावरुन महाविकास आघाडीतच हेवे-दावे सुरु असून मोठा भाऊ-छोटा भाऊ यावरुन वाकयुध्द सुरु आहे. यासोबतच, मंत्रीमंडळ विस्तार अद्यापही रखडला आहे. याबाबतही शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे. तर, श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात भाजप घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असल्याने या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे.
पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्यासह ज्येष्ठ डॉक्टरांनी जे.जे.रुग्णालयातील आपल्या अध्यापक पदाचा राजीनामा दिला. यासंदर्भातही एकनाथ शिंदे आणि शरद पवारांमध्ये चर्चा होऊ शकते. व कॅबिनेट मधील शेतकऱ्यांना अनुदान देण्याचे निर्णय याबाबत होण्याची शक्यता आहे