निर्णय मागे घ्या, सभागृह सोडणार नाही; शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर कार्यकर्ते भावूक, सभागृहातच ठिय्या

निर्णय मागे घ्या, सभागृह सोडणार नाही; शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर कार्यकर्ते भावूक, सभागृहातच ठिय्या

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे आत्मचरित्र 'लोक माझे सांगाती' च्या सुधारित आवृत्तीचे आज प्रकाशन झाले.
Published on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे आत्मचरित्र 'लोक माझे सांगाती' च्या सुधारित आवृत्तीचे आज प्रकाशन झाले. या पुस्तकामध्ये अनेक राजकीय गौप्यस्फोट केले गेले आहे. यावेळी भाषणादरम्यान शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केली आहे. परंतु, हा निर्णय राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मान्य नाही. कार्यकर्त्यांनी सभागृहातच घोषणाबजी करण्यास सुरुवात केली आहे. तर, अनेक कार्यकर्ते भावूक झाले असून शरद पवारांना घोषणा मागे घेण्याचे साकडे घालत आहेत.

राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याचा निर्णयांची शरद पवारांनी आज घोषणा केली आहे. यामुळे सभागृहात एकच गोंधळ निर्माण झाला असून महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार अशा घोषणा कार्यकर्त्यांकडून देण्यात येत आहे. तर, कार्यकर्ते आणि नेत्यांनी थेट स्टेजवरुन चढून शरद पवार आणि प्रतिभा पवार यांना निर्णय मागे घेण्यासाठी साकडे घातलं आहे. साहेब निर्णय मागे घ्या, सभागृह सोडणार नाही, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली आहे. मात्र, शरद पवार निवृत्तीच्या निर्णायावर ठाम आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com