'भारत जोडो' यात्रेतील राहुल गांधींचे फोटो होताहेत व्हायरल; युझर्सकडूनही मिळतीयं पसंती

'भारत जोडो' यात्रेतील राहुल गांधींचे फोटो होताहेत व्हायरल; युझर्सकडूनही मिळतीयं पसंती

'भारत जोडो' यात्रेला मिळतोय मोठा प्रतिसाद
Published on

मागील सप्टेंबरपासून काँग्रेसची महत्वकांक्षी 'भारत जोडो यात्रा' सुरु झाली आहे.

150 दिवसात ही पूर्ण होईल आणि 3,570 किमी अंतर पदयात्रा केली जाईल.

तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून 7 सप्टेंबर रोजी पदयात्रा सुरू झाली होती आणि जम्मू-काश्मीरमध्ये समाप्त होईल.

या पदयात्रेत राहुल गांधींसोबत 100 हून अधिक कॉंग्रेस जन सहभागी झाले आहेत. याशिवाय ही यात्रा जेथून जाईल तेथील स्थानिक यात सहभागी होत आहेत.

या यात्रेत राहुल गांधी अग्रभागी असून लोकांच्या भेटीगाठी घेत आहेत. यासाठी ते अनेकदा सुरक्षेच्या घेऱ्याबाहेरही जातात.

यादरम्यान त्यांना अनेक भेटवस्तूही देण्यात येत आहेत.

या यात्रेतील राहुल गांधींचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

नेटकरीही या फोटोंना पसंती दर्शवत आहेत.

नुकताच राहुल गांधी एका छोट्या मुलीला सॅंडल घालतानचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यावरुन युझर्संनी राहुल गांधींचे कौतुक केले.

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेस मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे.

तर, दुसरीकडे विरोधक या यात्रेवर जोरदार टीका करत आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com