मी काँग्रेस पक्षाचाच फॉर्म भरला होता, पण...: सत्यजित तांबे
आदेश वाकळे | संगमनेर : नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी मतदान केंद्रावर मतदान केले असून माध्यमांशी संवाद साधला आहे. विजय हा माझाच असेल, असा विश्वास सत्याजित तांबे यांनी यावेळी व्यक्त केला.
मी काँग्रेस पक्षाचाच फॉर्म भरला होता. मात्र, मला एबी फॉर्म मिळून न शकल्यामुळे तो अपक्ष झाला. संगमनेरच्या शारदा विद्यालय या ठिकाणी मतदान केल्यानंतर विविध विषयांना उत्तर देताना सत्यजित तांबे हे बोलत होते. बाळासाहेब थोरात यांच्याशी काही बोलणं झालं का, असं व पत्रकारांनी विचारल्यानंतर बाळासाहेब थोरात यांचे ऑपरेशन झालेले आहे. त्यामुळे ते अॅडमिट आहेत. त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच, शंभर पेक्षा जास्त संघटनांचा पाठिंबा देखील मिळाला असून विजय हा माझाच असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
तर, मी गेल्या 15 वर्षांपासून उत्तर महाराष्ट्रात सतत काम करत आहे. याचा चांगला प्रतिसाद सत्यजितला मिळत आहे. सर्वच लोक आमच्या सोबत आहे. व घराणेशाहीच्या पुढे जाऊन सत्यजितसाठी जनतेने विचार करायला हवा, असे आवाहन सुधीर तांबे यांनी केले होते.
दरम्यान, नाशिक पदवीधर मतदारसंघ या निवडणुकीत केंद्रस्थानी आला आहे. अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे आणि शिवसेना पुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटील यांच्यात सरळ लढत होत आहे. सत्यजित तांबे यांना कालच भाजपने पाठींबा जाहीर केला आहे.