अजित पवारांची राष्ट्रवादीमध्ये घुसमट होतेय : शिरसाट

अजित पवारांची राष्ट्रवादीमध्ये घुसमट होतेय : शिरसाट

अजित पवार यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Published on

सचिन बडे | छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या मेळाव्यात मोठे विधान केले आहे. विरोधी पक्षनेते पद नको, असे अजित पवार पवार यांनी म्हंटले होते. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. तर, शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादीत अजित पवार यांची घुसमट होत असून त्यांनी योग्य निर्णय घ्यावा, असा सल्ला शिरसांटानी दिला आहे.

अजित पवारांची राष्ट्रवादीमध्ये घुसमट होतेय : शिरसाट
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ प्रदेशाध्यक्ष पदासाठी इच्छुक

राष्ट्रवादी पक्षात अजित पवार यांची घुसमट होत असून त्यांनी योग्य निर्णय घ्यावा. मला अजित पवार यांचा स्वभाव आवडतो. अजित दादा जेव्हा भेटतील तेव्हा त्यांना आता तरी निर्णय घ्या अशी विनंती करेल. सत्ताधारी असून आम्हाला अजित पवार यांच्यावर होणारा अन्याय पाहावत नाही, असेही त्यांनी यावेळी म्हंटले आहे.

काय म्हणाले होते अजित पवार?

मला विरोधी पक्षनेत्यामध्ये फार काही इंटरेस्ट नव्हता. पण आमदारांनी आग्रह केला. म्हणून मी ती जबाबदारी घेतली. मी एक वर्ष विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी सांभाळली आहे. ते सांभाळत असताना काहींचे म्हणणे आहे की, तू कडक वागत नाही. आता त्यांची गचंडी धरु का? पण आता बस झाले. मला विरोधी पक्ष नेतेपदावरून मुक्त करा, संघटनेत कोणतेही पद द्या. मग कशापद्धतीने पक्ष चालतो ते बघा. तुम्हाला जे पद योग्य वाटेल ते द्या. त्या पदाला योग्य न्याय मिळवून देईन, असे अजित पवार यांनी म्हंटले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com