अजित बंडानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, मी खंबीर...

अजित बंडानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, मी खंबीर...

अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नऊ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यावर आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर येत आहे.
Published on

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप झालेला आहे. शिवसेनेनंतर राष्ट्रवादी पक्षातही फूट पडली आहे. अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नऊ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यावर आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर येत आहे. मी खंबीर आहे. लोकांचा पाठिंबा आपल्याला आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.

अजित बंडानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, मी खंबीर...
मी अजित अनंतराव पवार...; उपमुख्यमंत्री पदाची घेतली शपथ

संजय राऊत यांनी ट्विटरवरुन राजकीय घडामोडींवर भाष्य करताना शरद पवारांची प्रतिक्रिया सांगितली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचे साफ मातेरे करण्याचां विडा काही लोकांनी उचलला आहे. त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या. माझे आताच शरद पवार यांच्याशी बोलणे झाले. ते म्हणाले, मी खंबीर आहे. लोकांचा पाठिंबा आपल्याला आहे. उद्धव ठाकरेंसह पुन्हा सर्व नव्याने उभे करू, असे संजय राऊत यांनी सांगितले आहे. तसेच, भाजपा ज्यांना तुरुंगात पाठवायला निघाले होते. त्यांनाच मंत्री पदाची शपथ देत आहे, अशी टीकाही संजय राऊतांनी केली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे जे आमदार आज शपधविधी घेत आहेत तसेच सत्तेत सहभागी होत आहेत त्यांची ती वैयक्तिक भूमिका आहे. पक्षासोबत या घडामोडींचा काहीच संबंध नाही, असं पक्षाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com