Sanjay Raut
Sanjay RautTeam Lokshahi

विधीमंडळातील गोंधळ, हक्कभंगावर राऊतांची एका वाक्यात उत्तर; म्हणाले, त्यांना गरज लागली तर..

विधीमंडळ हे चोरमंडळ आहे, असं धक्कादायक वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले आहे. यावरुन आज अधिवेशनात एकच गदारोळ झाला
Published on

मुंबई : विधीमंडळ हे चोरमंडळ आहे, असं धक्कादायक वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले आहे. यावरुन आज अधिवेशनात एकच गदारोळ झाला. यावर दोन दिवसांत अभ्यास करुन ८ मार्च रोजी पुढील निर्णय जाहीर करणार असल्याचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांना अभ्यास करु द्या. त्यांना गरज लागली तर माझा अभ्यास मी त्यांच्यापर्यंत पोहचवेल, असा खोचक टिप्पणी त्यांनी केली आहे.

Sanjay Raut
'त्या' विधानावरुन मुख्यमंत्र्यांविरोधातच विधानपरिषदेत ठाकरे गटाची हक्कभंगाची नोटीस

सध्या देशासाठी सर्वोच्च न्यायालय आशेचा एकमेव किरण आहे. बाकी सर्व मंदिरे ही नावपुरतीच आहेत. त्या मंदिरात चप्पल चोरांची गर्दी जास्त आहे. पण, सर्वोच्च न्यायालय हे आजपण जनता, लोकशाही, स्वातंत्र्य यांच्यासाठी एकमेव आशेचा किरण आहे. महाराष्ट्र व देशाची लोकशाही हे सर्व जण सर्वोच्च न्यायलयाकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहे आम्हाला खात्री आहे तिथे निकाल लागणार नाही तर न्याय मिळणार आहे, असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला.

तर, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षाने चहा पानावर रितसर पत्र देऊन बहिष्कार टाकला. यावेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री यांनी देशद्रोहयांसोबत चहापान करणे आपण टाळले, असे म्हंटले. यावरुन विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग नोटीस आणली आहे. याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, आपण जी संसदीय लोकशाहीची पध्दत स्वीकारलेली आहे. ते लोकशाहीमध्ये विरोधकांचे स्थान हे उच्च आहे. पंडीत नेहरुंपासून ते पंतप्रधान मननोहन सिंहांपर्यंत प्रत्येक पंतप्रधान, राष्ट्रपती, सत्ताधारी पक्षाने विरोधकांचा आवाज नेहमी ऐकला. आणि जेव्हा तो दडपण्याचा प्रयत्न झाला तेव्हा सत्ताधऱ्यांचा पराभव जनतेने केला आहे. यामुळे दानवे यांची भूमिका योग्य आहे.

मुख्यमंत्र्यांचे विधान हे ज्या संगतीमध्ये वावरत आहेत त्याचा परिणाम आहे. सध्या त्यांनी सुसंगती सोडली असून कुसंगतीला लागले आहे. यामुळे लोकशाही, स्वातंत्र्य या अनेक विषयांवर त्यांचा संबंध तुटला. पण, आम्ही अजूनही लोकशाही मानतो. नाहीतर निवडणुका लढवण्यात काही अर्थ नाही, अशी जोरदार टीका त्यांनी एकनाथ शिंदेंवर केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com