Samruddhi Mahamarg Accident : सदोष मनुष्य वधाचा गुन्हा फडणवीस आपल्यावर दाखल करणार का? राऊतांचा सवाल
मुंबई : समृद्धी महामार्गावर शनिवारी मध्यरात्री खासगी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोकाकळा पसरली आहे. यावरुन आता विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकराला घेरण्यास सुरुवात केली आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. राजकीय श्रेय घेण्यापेक्षा अपघात जे अपघात त्याचा सदोष मनुष्य वधाचा गुन्हा फडणवीस आपल्यावर दाखल करून घेणार का? असा सवाल राऊतांनी विचारला आहे.
संपूर्ण समृद्धी महामार्गाचे पुन्हा एकदा तांत्रिक तपासणी केली पाहिजे. राजकीय श्रेय घेण्यापेक्षा अपघात का होता हे पाहणं गरजेचं आहे. या आधी देखील जे अपघात झाले त्याचे सदोष मनुष्य वधाचा गुन्हा देवेंद्र फडणवीस आपल्यावर दाखल करून घेणार का? याआधी अनेक कुटुंब या ठिकाणी अपघातात उद्ध्वस्त झाली त्याची जबाबदारी कोण घेणार? हे सरकार फक्त जे प्रकल्प निर्माण करत आहेत ते खोके खाण्यासाठी आणि ठेकेदारांची धन करत आहेत, अशी जोरदार टीका संजय राऊत यांनी केली आहे.
मणिपूरचे मुख्यमंत्री बोलतात हे प्रीप्लान आहे. पण, केंद्र सरकार तुमचं आहे. गृहमंत्री, गृहमंत्रालय तुमचं आहे. मणिपूरचा प्रीप्लान नक्की कोणी केलेला आहे? मणिपूरच्या हिंसाचारामध्ये चीनचा हात आहे तर तुम्ही चीनला काय उत्तर दिलं? तुम्ही या संदर्भात राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. सर्व प्रकारे या गोष्टींना तिकडचं मुख्यमंत्री जबाबदार आहेत. त्या ठिकाणी पंतप्रधान का गेले नाहीत? त्या ठिकाणी चर्चा का केली नाही? गृहमंत्री गेल्याने लगेच परतून आले. आता राहुल गांधी चालले आहे तर मग तुम्हाला काय त्रास होत आहे? राहुल गांधी जातात म्हणून त्यांनी या ठिकाणी प्रश्न उपस्थित केलाय.
पंतप्रधानला भोपाळ जात आहेत अनेक ठिकाणी जात आहेत. परंतु, या ठिकाणी मणिपूरला जात नाहीत. चीनने केलेला अतिक्रमणाला मणिपूरमध्ये जाऊन उत्तर कां देत नाहीत? मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केले पाहिजे, असेही त्यांनी म्हंटले आहे. महाराष्ट्रामध्ये सरकार बनवण्यासाठी गेल्या तीन दिवस वेळ गेला तर या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात तयार झाले होते, असेही संजय राऊतांनी म्हंटले आहे.