नको रे बाबा संरक्षण! आडनावाच्या वादावरुन संभाजी राजेंचा गौतमी पाटीलला आधी पाठिंबा, आता युटर्न

नको रे बाबा संरक्षण! आडनावाच्या वादावरुन संभाजी राजेंचा गौतमी पाटीलला आधी पाठिंबा, आता युटर्न

काही मराठा संघटनांनी गौतमी पाटील हिच्या आडनावावर आक्षेप घेतला आहे.
Published on

मुंबई : सबसे कातील गौतमी पाटील ही नेहमी वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असते. गौतमी पाटीलचे लहानांपासून ते वृध्दांपर्यंत सर्वांच जण चाहते आहेत. परंतु, आता काही मराठा संघटनांनी गौतमी पाटील हिच्या आडनावावर आक्षेप घेतला आहे. यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. यात छत्रपती संभाजी राजेंनीही गौतमी पाटीलला पाठिंबा दिला होता. परंतु, यावरुन आता संभाजी राजेंनी युटर्न घेतला आहे.

नको रे बाबा संरक्षण! आडनावाच्या वादावरुन संभाजी राजेंचा गौतमी पाटीलला आधी पाठिंबा, आता युटर्न
किरीट सोमय्यांना आमची नाक घासून माफी मागावी लागेल : अनिल परब

काय म्हणाले होते संभाजी राजे?

शिवाजी महाराजांनी महिलांना संरक्षण दिलं आहे. कलाकरांना संरक्षण मिळालं पाहिजे या मताचा मी आहे. सर्वांनी महिलांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. कलाकार म्हणून गौतमी पाटील हिच्या पाठीशीही उभं राहिलं पाहिजे, असे संभाजीराजे यांनी म्हणाले होते.

संभाजी राजेंचे स्पष्टीकरण

काल एका पत्रकाराने एका महिलेचा "कलाकार" असा उल्लेख करत, तिला त्रास व धमक्या दिल्या जात आहेत म्हणत मला प्रतिक्रिया विचारली. मला त्या व्यक्तीची व तिच्या कलेची काहीही माहिती नव्हती. पण महिला कलाकाराला धमक्या येणे हे चुकीचे समजून मी बोलून गेलो की कलाकारांना संरक्षण दिले पाहिजे. मात्र, आज त्याचे नकारात्मक पडसाद उमटल्यावर आश्चर्याने या कलाकाराची "कला" मी बघितली. आता असे वाटत आहे, महाराष्ट्राची संस्कृती बिघडवणाऱ्या अशा 'कले'ला नको रे बाबा संरक्षण, असे संभाजीराजेंनी म्हंटले आहे.

दरम्यान, पाटील या आडनावावर काही मराठा संघटनांनी आक्षेप घेतल्यानंतर गौतमीने प्रतिक्रिया दिली होती. मी पाटीलच आहे आणि हेच नाव मी वापरतेय माझ्याबद्दल कोणी काहीही बोलले तरी मला काही फरत पडत नाही. मी जे कार्यक्रम करते ते सांस्कृतिक कार्यक्रम आहेत म्हणून माझे हे कार्यक्रम लोकांना जास्त आवडतात, असे तिने ठामपणे सांगितले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com