'राज ठाकरे यांची पूर्वीची भाषण करण्याची  स्टाईल आता राहिली नाही'

'राज ठाकरे यांची पूर्वीची भाषण करण्याची स्टाईल आता राहिली नाही'

आमदार रोहित पवार यांचा राज ठाकरेंला टोला
Published on

अभिराज उबाळे | पंढरपूर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे जे पूर्वीच्या स्टाईलने भाषण करायचे, त्यांची पूर्वी जी बॉडी लॅग्वेज असायची. ती आता राहिली नाही. शिवाय सर्वसामान्य लोकांचे प्रश्न मांडायची स्टाईल आणि बॉडी लॅग्वेजही राहिली नाही, असा टोला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी लगावला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे राज ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मिमिक्री करत शरद पवारांच्या राजीनामा नाट्यावर भाष्य केलं होते. यावर रोहित पवार यांनी टीका केली आहे.

'राज ठाकरे यांची पूर्वीची भाषण करण्याची  स्टाईल आता राहिली नाही'
उंची छोटी, भेजा छोटा असलेल्यांबाबत बोलायचे नसते; आव्हाडांचा नितेश राणेंवर निशाणा

राज ठाकरे यांनी‌ कालच्या सभेत अर्ध भाषण पूर्वीच्या लोकांना‌ आवडणारं केलं आणि अर्ध भाषण इतर पक्षांच्या प्रभावाखाली होत की काय? अशी शंका येण्यासारखं होतं. दुसऱ्यांच्या बॉडी लॅग्वेज‌पेक्षा त्यांचीच बॉडी लॅग्वेज बदलली आहे, अशी टीका रोहित पवार यांनी राज ठाकरेंवर केली.

तर, अजित पवारांनीही राज ठाकरेंवर निशाणा साधला होता. राज ठाकरे यांना मिमिक्रीशिवाय काय जमतं? मिमिक्री करणे हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे. त्यांनी त्यांचा पक्ष वाढवण्याऐवजी त्यांना अजित पवारांवर मिमिक्री करणे आणि अजित पवारांचे व्यंगचित्र काढणे याच्यात समाधान वाटते. याच्यातून ते आनंदी होत असेल तर त्यांना शुभेच्छा, असा मार्मिक टोला अजित पवारांनी लगावला होता..

काय म्हणाले होते राज ठाकरे?

अजित पवारांची नक्कल करत राज ठाकरे म्हणाले की, राजीनाम्याचा गोंधळ सुरू होता तो संपला. मी निवडणूक लढवणार नाही, असं शरद पवार म्हणाले होते. समोर शरद पवार होते. तेव्हा लोकं म्हणाले, त्यांनी निवडणूक लढवली पाहिजे. यावेळी शरद पवार यांना खरचं राजीनामा द्यायचा होता, असं मला वाटतं. पण, राजीनामा दिल्यानंतर अजित पवार जे वागलेत. ये तू गप्प बस. ये तू शांत बस. माईक हातात घेतला. हे सगळं पवार साहेबांच्या डोळ्यादेखत होत होतं. ते म्हणाले असतील मी जर खरंच राजीनामा दिला तर हे मला पण ये तू गप्प बस तू असे म्हणतील. त्यामुळेच त्यांनी निर्णय मागे घेतला, अशी टीका त्यांनी अजित पवारांवर केली होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com