Raj Thackeray - Uddhav Thackeray
Raj Thackeray - Uddhav ThackerayTeam Lokshahi

उद्धव ठाकरे, राज ठाकरे ॲक्शन मोडमध्ये, ही आहेत कारणे

सर्व जिल्हाप्रमुख आणि विभागप्रमुखांशी साधणार ऑनलाईन संवाद साधणार आहे. दुसरीकडे राज ठाकरे मनसेमध्ये अ‍ॅक्टीव्ह झाले आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाजपासोबत मिळून सरकार स्थापन केल्यानंतर शिवसेनेला धक्क्यावर धक्के देत आहेत. त्यातच आता शिंदे गटाने शिवसेनेला (shivsena) आणखी बसू नये, यासाठी प्रयत्न सुरु झाले आहे. लोकप्रतिनिधी सोडून जात असतांना पक्ष वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे सरसावले आहे. आज सायंकाळी सर्व जिल्हाप्रमुख आणि विभागप्रमुखांशी साधणार ऑनलाईन संवाद साधणार आहे. दुसरीकडे राज ठाकरे मनसेमध्ये अ‍ॅक्टीव्ह झाले आहे.

Raj Thackeray - Uddhav Thackeray
भंडाऱ्यात मासेमारी गेलेले 6 तरुण पुराच्या पाण्यात अडकले

लोकप्रतिनिधी गेले तरी संघटनात्मक पातळीवर मात्र पक्ष मजबूत ठेवण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रो बैठकांचा सपाटा सुरु केला आहे. आज पुन्हा उद्धव ठाकरे जिल्हाप्रमुख आणि विभाग प्रमुखांशी संवाद साधणार आहे. महिनाभरात जिल्हाप्रमुखांशी चौथ्यांदा संवाद साधत आहे. काही नियमित बैठकांसाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे शिवसेना भवनलाही उपस्थित राहणार आहे.

Raj Thackeray - Uddhav Thackeray
Varun Sardesai : शिंदे गटाचा शिवसेनेला आणखी एक धक्का, वरुण सरदेसाईंची युवासेना राज्य सचिवपदावरुन हकालपट्टी

राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये

मनसे अध्यक्ष राज ठाकरे प्रकृती बरी झाल्यानंतर आता ॲक्शन मोडमध्ये आले आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीला लक्षात घेऊन मंगळवारी त्यांनी आढावा बैठक आयोजित केली आहे. आज ईशान्य मुंबईतील मनसे पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे बैठक घेणार आहे. संघटनात्मक बांधणी, पक्षीय परिस्थिती, स्थानिक परिस्थिती तसेच निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असणारे पदाधिकारी या सर्वांचा बैठकीत आढावा घेतला जाणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com