शिवसेना कोणाची याचा आधी निर्णय, मग अपात्रतेचा...; नार्वेकरांनी सांगितली प्रोसेस

शिवसेना कोणाची याचा आधी निर्णय, मग अपात्रतेचा...; नार्वेकरांनी सांगितली प्रोसेस

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षातील 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांवर सोपविला आहे.
Published on

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षातील 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांवर सोपविला आहे. यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावरुन राजकीय आरोप सुरु आहेत. या आरोपांना राहुल नार्वेकर यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले आहे. यादरम्यान नार्वेकरांनी संपूर्ण निर्णयाची प्रक्रियाच सांगितली आहे. लवकरात लवकर निर्णय घेणार म्हणजे कोणतीही घाई करणार नाही. निर्णय पक्षपाती घेणार नाही. कमीत कमी वेळ लागेल असा प्रयत्न करेन, असे त्यांनी म्हंटले आहे.

शिवसेना कोणाची याचा आधी निर्णय, मग अपात्रतेचा...; नार्वेकरांनी सांगितली प्रोसेस
संजय राऊत आणि उद्धव ठाकरे डिप्रेशनमध्ये, म्हणूनच...; नारायण राणेंचा घणाघात

सर्वोच न्यायालयाने निकाल दिला आहे. न्यायालयाचे आभार मानतो संविधानिक शिस्त पाळत न्याय दिला आहे. अध्यक्षांचे हक्क अबाधित ठेवल्याबद्दल आभारी आहे. लवकरात लवकर निर्णय घेईन पण कोणत्याही दबावाखाली निर्णय घेणार नाही, असे राहुल नार्वेकर यांनी म्हंटले आहे.

कोर्टाने निकालात सांगितले आहे की, नेमकी 2022 जून-जुलैमध्ये राजकीय पक्ष कोणता गट प्रतिनिधित्व करत होता. या संदर्भात सर्वात पहिले निर्णय घेण्यास सांगितले आहे. राजकीय गट कोणता आहे हे निश्चित केल्यानंतर त्या राजकीय पक्षाची भूमिका काय होती? त्यांची इच्छा काय होती? प्रतोद कोणी व्हावं, गट नेता कोणी व्हावं? या निर्णयावर विचार केला जाईल. हे झाल्यावर प्रत्येक याचिकेवर निर्णय दिला जाईल, असे त्यांनी सांगितले आहे.

माझ्याकडे वेगवेगळ्या पाच प्रमुख याचिका आल्या आहेत. या पाच याचिकेत 54 आमदारांना पक्ष केलेलं आहे. या याचिकेवर सुनावणी करताना प्रिंसिपल ऑफ जस्टीस याचे पालन केले जाईल. हे सर्व करत असताना सीपीसी नियमाच्या प्रोव्हिजन फॉलो कराव्या लागतील. सगळी कायदेशीर बाब पूर्ण केल्यानंतरच निर्णय दिला जाईल.

माझ्याकडे कोणतेच निवेदन आलेले नाहीये. रिजनेबल टाइम हा प्रत्येक केसचा वेगळा असतो. जो वेळ एका केससाठी असेल तोच वेळ सर्व केससाठी असेल असं कधी नसतं. हा खरं तर एक चर्चेचा विषय आहे. म्हणून हा निर्णय घेताना आम्ही कोणतीही दिरंगाई करणार नाहीये. पण घाई सुद्धा करणार नाहीये, असेही नार्वेकरांनी स्पष्ट केले आहे.

न्याय देताना चूक होऊ देणार नाही. म्हणून सर्व नियमांचा विचार करूनच निर्णय घेतला जाईल. राजकीय पक्ष कोण आहे हे सर्व ठरवायला निवडणूक आयोगाला 3-6 महिने लागलेच होते. या याचिकेवर निर्णय द्यायला सुद्धा कोर्टाला 10 महिने लागले, असेही त्यांनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com