पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यांचा अदानींना फायदा; राहुल गांधींचा आरोप

पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यांचा अदानींना फायदा; राहुल गांधींचा आरोप

राहुल गांधी यांनी अदानी मुद्द्यावरून मोदी सरकारवर साधला निशाणा
Published on

नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी लोकसभेत आभार प्रस्तावावर चर्चा झाली. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या भारत जोडो यात्रेचा उल्लेख करत महागाई, बेरोजगारी, अग्निवीर योजना, गरिबी आणि अदानी या मुद्द्यांवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला. पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यांमध्ये अदानींना फायदे दिले जातात, असा आरोप राहुल गांधींनी केला.

पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यांचा अदानींना फायदा; राहुल गांधींचा आरोप
नाना पटोले व बाळासाहेब थोरातांमधील वाद विकोपाला; सत्यजित तांबे म्हणाले...

राहुल गांधी म्हणाले, मी प्रवास केला. या काळात तमिळनाडू, केरळपासून हिमाचलपर्यंत प्रत्येक राज्यात हेच नाव ऐकू आले. अदानी, अदानी, अदानी." राहुल गांधी म्हणाले की, तरुण विचारत आहेत की आम्हालाही अदानीसारखे स्टार्टअप सुरू करायचे आहे का. तो ज्या व्यवसायात हात घालतो त्यात तो यशस्वी होतो. ते म्हणाले की, यापूर्वी अदानी जगातील श्रीमंतांमध्ये ६०९ व्या क्रमांकावर होते, अशी काय जादू घडली की नऊ वर्षांत ते दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला. मोदीजी दिल्लीत आल्यावर खरी जादू सुरू झाली. यावेळी काँग्रेस खासदारांनी मोदी है तो मुमकिन है, अशा घोषणा दिल्या.

आज रस्त्याने चालत जा आणि कोणी बांधले ते विचारा, तर अदानींचे नाव पुढे येईल. हिमाचलचे सफरचंद अदानीचे आहे. अदानी यांचे पंतप्रधानांशी कसे संबंध आहेत हे देशाला जाणून घ्यायचे आहे, असे म्हणतानाच राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींचे जुना फोटो दाखवला. यावरुन सत्ताधारी खासदारांनी गदारोळ केला. स्पीकर ओम बिर्ला यांनी राहुल गांधींना अडवलं आणि पोस्टरीटी करू नका, असं सांगितलं.

राहुल गांधी पुढे म्हणाले की, तरुण आम्हाला विचारत आहेत की अदानी फक्त 8-10 सेक्टरमध्ये आहे. अशा परिस्थितीत त्यांची संपत्ती 2014 मध्ये 8 अब्ज डॉलरवरून 2022 मध्ये 140 अब्ज डॉलरवर कशी पोहोचली? ज्यांना विमानतळाचा पूर्वानुभव नाही त्यांना विमानतळाच्या विकासात सामावून घेतले जात नाही, असा नियम आहे. भारत सरकारने हा नियम बदलला. पंतप्रधान ऑस्ट्रेलियाला जातात आणि स्टेट बँक ऑफ इंडिया जादूने अदानींना कर्ज देते.

मी उदाहरण देत आहे, मोदीजी जगभर फिरतात, काय होते. ते बांगलादेशात जातात, तिथे बांगलादेशला वीज विकण्याचा निर्णय होतो, काही दिवसांनी बांगलादेशने अदानीसोबत 25 वर्षांचा करार केला. यानंतर अदानींवर दबाव आणून श्रीलंकेत पीएम मोदी हा प्रकल्प पूर्ण करून घेतात, असा आरोप त्यांनी केला. तसेच, हे अदानींचे परराष्ट्र धोरण असल्याचेही म्हंटले आहे.

एलआयसीबाबत राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान आणि भारत सरकार अदानींना कशी मदत करतात. भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील बँका अदानींना हजारो कोटी रुपये देत आहेत. एसबीआय, पीएनबीसारख्या बँकांचा समावेश आहे. या बँकांचे पैसे, एलआयसीचे पैसे अदानीकडे जात आहेत. त्यांच्या विरोधात कोणी उभे राहताच ईडी, सीबीआयच्या तपास यंत्रणा मदतीला धावून येतात. काही दिवसांपूर्वी हिंडेनबर्गचा अहवाल आला होता. अदानींच्या शेल कंपन्या देशाबाहेर आहेत असे सांगण्यात आले होते. या शेल कंपन्या हजारो कोटी रुपये पाठवत आहेत, हा कोणाचा पैसा आहे, असा प्रश्नही राहुल गांधींनी विचारला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com