वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची युती होणार? प्रकाश आंबेडकर म्हणाले...

वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची युती होणार? प्रकाश आंबेडकर म्हणाले...

अजित पवारांच्या बंडानंतर राज्यात नवीन राजकीय समीकरणे जुळण्याची शक्यता निर्माण झाली आहेत. अशात वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची युती होणार आल्याच्या चर्चा रंगत आहेत.
Published on

अमोल नांदुरकर | अकोला : अजित पवारांच्या बंडानंतर राज्यात नवीन राजकीय समीकरणे जुळण्याची शक्यता निर्माण झाली आहेत. अशात निवडणुका जवळ आल्या तेव्हा वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची युती होणार आल्याच्या चर्चा रंगत आहेत. यावर काँग्रेसने वंचित सोबत युती करावी की नाही करावी याचा निर्णय लवकर घ्यावा, असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांनी केलं आहे.

वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची युती होणार? प्रकाश आंबेडकर म्हणाले...
ठाकरे बंधू एकत्र येणार? राऊतांनी सरळ सांगून टाकले...

तर, राष्ट्रवादीच्या फुटीनंतर ठाकरे गटातील काही नेत्यांनी एकला चलोचे विधान केले होते. यावर उद्धव ठाकरेंनी सुद्धा आघाडीत राहायचं की नाही याचा निर्णय लवकर घेतला पाहिजे, असा प्रकाश आंबेडकर यांनी सल्ला दिला आहे. उद्धव ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्याचं आंबेडकरांनी स्वागतही केलं आहेय.

दरम्यान, प्रकाश आंबेडकरांनी अजित पवारांची स्तुती करत त्यांच्या ओठात ते पोटात एकच असून ते स्पष्टवक्ता असल्याचंही म्हणाले. सोबतच भाजप सोबत जाऊन अजित पवारांनी त्यांचं राजकीय भविष्य सेटल केलं असून शरद पवार आता स्वतःच ठरवतील, असेही त्यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com