Bachhu Kadu
Bachhu KaduTeam Lokshahi

येणाऱ्या काळात प्रहारचा मुख्यमंत्री होऊ शकतो- बच्चू कडू

त्यांचं आडनाव ५२ असल्यानं त्यांनी ५२ आमदार निवडून आणणार असं सांगितलं असेल.
Published by :
Sagar Pradhan
Published on

राज्यात सध्या प्रचंड राजकीय खलबतं घडताना दिसत आहे. या गोंधळादरम्यान पुढच्या निवडणुकीत ५२ आमदार निवडून आणणार, असं भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हंटले होते. त्यावरच आता प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. त्यांचं आडनाव ५२ असल्यानं त्यांनी ५२ आमदार निवडून आणणार असं सांगितलं असेल. प्रहारसुद्धा विदर्भात दहा आमदार निवडून आणणार असल्याचं कडू यांनी सांगितलं.

Bachhu Kadu
'बोम्मई हा खोटारडा माणूस' ट्विटवरून जितेंद्र आव्हाड बोम्मईवर भडकले

नेमकं काय म्हणाले बच्चू कडू?

चंद्रशेखर बावनकुळे यांची जादू किती चालणार ते बघू. सरकारच्या अडीच वर्षांच्या कामगिरीवर बरचं काही अवलंबून आहे. शिंदे-भाजपची सरकार असल्यामुळं कदाचित ही जादू होऊ शकते. २०२४ मध्ये फडणवीस मुख्यमंत्री असतील, असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले. यावर बोलताना बच्चू कडू म्हणाले, भविष्यवाणी करण्यात काही अर्थ नसतो. जर तर मध्ये आम्ही विश्वास ठेवत नाही. येणारी परिस्थिती कशी आहे, त्यावर बरेच काही अवलंबून असते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ शकतात. किंवा एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात. प्रहार या लहान पक्षाचापण मुख्यमंत्री होऊ शकतो. आम्हीपण म्हणू शकतो. येणाऱ्या काळात प्रहारचा मुख्यमंत्री होऊ शकतो. पण, याला काही अर्थ नाही. असे बच्चू कडू यावेळी म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com